गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना उपयुक्त टिप्स

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

येवला - कपाशीवर आलेल्या बोंडअळीने मागील वर्षी शेतकऱ्यांना कोट्यावधी रुपयांचा चुना लावला आहे. त्यामुळे यावर्षी अशी वेळ येऊ नये यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना कपाशी पिकावर येणाऱ्या रसशोषक किडी व बोंडअळ्या यांची ओळख, नुकसानीचा प्रकार व त्यांचे एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करत टिप्स दिल्या.

कोळम खुर्द येथे तालुका कृषी विभाग व कृषिनिविष्ठा विक्रेते यांच्या वतीने कपाशीवरील गुलाबी बोंडअळी नियंत्रण शेतकरी कार्यशाळा व शेतकरी मेळावा घेण्यात झाला. अध्यक्षस्थानी तालुका अग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप मुंदडा होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र कृषी विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष दिनेश मुंदडा व नितीन काबरा हे उपस्थित होते.

बोंड अळी येण्याची विविध कारणे, व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा वापर, कामगंध सापळे वापरताना घ्यावयाची काळजी, कीटनाशकांची फवारणी व शेतकऱ्यांचा सामुहिक सहभाग याविषयी तालुका कृषी अधिकारी अभय फलके व महिको मोंसंटो बायोटेकचे विभागीय समन्वयक दत्ता इथापे यांनी मार्गदर्शन केले. पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रशांत वास्ते यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेची माहिती दिली.याप्रसंगी अमोल पाटील, नवनाथ भोंडवे, जगदीश चव्हाण, राहुल बंगले आदींनी मनोगत व्यक्त केले. घरडा केमिकल्सच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किटचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन कृषी अधिकारी ज्ञानेश्वर खाडे यांनी केले होते. शेतकरी वैभव कदम यांनी आभार मानले. कोळम, भारम, डोंगरगाव, वाघाळे आदी गावांतील शेतकरी, महिला बचत गटांच्या सदस्या, कृषी निविष्ठा विक्रेते व वितरक तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विभागाचे कर्मचारी, ऍग्रो डीलर्स असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Tips for Farmers to Control Pink Bondali