यंदा टोमॅटोचे उत्पादन तीन लाख टनांनी घटणार 

यंदा टोमॅटोचे उत्पादन तीन लाख टनांनी घटणार 

नाशिक - टोमॅटो, कांदा, बटाट्यांचा उत्पादक अन्‌ ग्राहक यांना दुहेरी फायदा होण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयातर्फे सुरू करण्यात आलेल्या "ऑपरेशन ग्रीन टॉप' योजनेला वर्षभरातच घरघर लागली आहे. "टॉप' उत्पादनांमधील महत्त्वाचा घटक असणाऱ्या टोमॅटोची राज्यातील अवस्था नाजूक झाली असून, यंदाच्या पहिल्या अंदाजानुसार टोमॅटोचे उत्पादन यंदा 3 लाख टनांनी कमी होणार आहे. यामुळे वर्षभर मिळणाऱ्या भावाच्या सरासरीनुसार 458 कोटी रुपयांवर सरकारला पाणी सोडावे लागणार आहे. 

देशात 2007-08 ते 2017-18 या कालावधीत टोमॅटोच्या उत्पादनात दुपटीने वाढ झाली असून, त्याच वेळी निर्यातीत पाकिस्तान, बांगलादेशचा हिस्सा 75 टक्के राहिला. 2016-17 मध्ये 368 कोटींची निर्यात पाकिस्तानमध्ये झाली होती. 2017-18 मध्ये हीच निर्यात 34 लाखांवर घसरली. बांगलादेशमध्ये 66 कोटींऐवजी अवघी 5 कोटींच्या टोमॅटोची निर्यात झाली. या दोन्ही देशांच्या सीमा बंद राहत असल्याने टोमॅटोची आवक वाढून देशांतर्गत बाजारपेठेतील भाव गडगडतात, त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्यावर टोमॅटो फेकून द्यावा लागतो. सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे, 2017-18 मध्ये 2 कोटी 20 लाख टन टोमॅटोचे देशात उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्षात 1 कोटी 97 लाख टन उत्पादन झाले आहे. जानेवारीमध्ये देशांतर्गत बाजारपेठांमध्ये मागील सहा वर्षांमध्ये 3 लाख 55 हजार टन टोमॅटो शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला होता. यंदाच्या जानेवारीमध्ये 1 लाख 16 हजार टनांनी म्हणजेच, 2 लाख 39 हजार 290 टनांची आवक झाली आहे. 

अन्य राज्यांतील उत्पादन वाढले 
टोमॅटोचे 2013-14 ते 2017-18 या कालावधीत दर वर्षी सरासरी 1 कोटी 88 लाख टनांचे उत्पादन झाले आहे. यंदा 2 कोटींहून अधिक टनाच्या उत्पादनाचा प्राथमिक अंदाज केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रामध्ये मागील सहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी वार्षिक 10 लाख टनांहून अधिक उत्पादन घेतले आहे. विभागाच्या पहिल्या अंदाजानुसार यंदा मात्र महाराष्ट्रात 7 लाख 81 हजार टनांपर्यंत उत्पादन अपेक्षित आहे. टोमॅटोचे गडगडणारे भाव आणि परदेशी बाजारपेठेचा अभाव ही त्यामागील कारणे आहेत. पण त्याच वेळी टोमॅटो उत्पादनाचा आलेख आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, तेलंगणा, हरियाना, उत्तराखंडमध्ये उंचावत निघाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com