खामखेडा- नियम डावलुन गतिरोधकांची उभारणी; नागरिकांना त्रास

खंडू मोरे
रविवार, 22 एप्रिल 2018

खामखेडा (नाशिक)- सन २०१७/१८ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे कामे झालीत. तसेच दुरुस्तीच्या झालेल्या जिल्हाभरातील विविध रस्त्यांवर नियमांना डावलुन गतिरोधक उभारण्यात आले असुन पांढरे पट्टे नसण्यासह लांबी-रुंदीचे कसलेही निकष पाळण्यात आलेले नसल्याने गतिरोधकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळू लागल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. गरज नसलेल्या ठिकाणी नियम पायदळी तुडवून सर्रासपणे रस्त्यांवर ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या या गतिरोधकांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने घडणाऱ्या अपघातास यंत्रणेला जबाबदार धरावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अपघातांचे प्रमाण कमी व्हावे आणि वेगावर नियंत्रण राहावे यासाठी रस्त्यावर गतिरोधक तयार केले जातात. ज्या ठिकाणी सतत अपघात घडून जिवितहानी होत असते अशा ठिकाणी गतिरोधक बसवले जावेत अशी नियमावली असताना रस्त्यांवर गतिरोधकांचे पिक आल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांवरील गतिरोधक बसविताना नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र आहे. बहुतांश भागांत नागरिकांनी स्वत:च मनमर्जी करत रस्ता काम चालू असतांना संबंधित ठेकेदारांकडून गतिरोधक निर्माण करुन घेतले आहेत. हे गतिरोधक वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरत आहेत.काही गतिरोधक इतके उंच आहेत की, वाहनाने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मानेचे व कंबरेचे आजार जडू लागले आहेत. 

गतिरोधक बसवताना नियमावली आखून दिली आहे. या नियमांचे पालन करूनच गतिरोधक तयार करायचे असतात.गतिरोधकांची उंची किती असावी? दोन्ही बाजूला उतार कसा असावा? याबाबतची माहिती या नियमांमध्ये असते.मात्र, जिल्हा भरातील रस्त्यांवरचे गतिरोधक पाहिल्यावर हे नियम धाब्यावर बसवण्यात आले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

रस्ता ठेकेदार करताहेत मनाप्रमाणे बांधणी
ग्रामीण भागातील रस्त्यांवर बांधण्यात येणाऱ्या गतिरोधकांवर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. रस्ता तयार करणारे ठेकेदार रस्त्यांवरील गतिरोधकचे काम नियमानुसार बांधत आहे की नाही यावर अभियंत्यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. मात्र, अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे कंत्राटदार आपल्या मनाने गतिरोधक बांधत आहेत.

गतिरोधक दुरून नजरेत यावेत यासाठी अंधारातही चमकतील असे पांढरे पट्टे त्यावर मारणे गरजेचे आहे.परंतु कित्येक ठिकाणी हे पट्टे नसल्याने वाहनचालक गडबडून जात आहेत.
अरुण पवार,शिक्षक सटाणा

गतिरोधक बांधताना त्यांची लांबी, रुंदी आणि उंची निश्चित करण्यात आली आहे.मात्र जिल्ह्यातील अनेक गतिरोधकांवर नियमांचे पालन न केल्याचे दिसते. चारचाकी वाहनांची खालची बाजू या गतिरोधकांना लागून वाहनांचे नुकसान होत आहे़.
सुधाकर आहेर.वाहन चालक देवळा.
 
Web Title: too many speed breakers on road becomes issue for people