हजार रुपयाचे आमिष दिले अल्पवयीन मुलाला...अन् घेऊन गेले रुमवर..त्यानंतर..

minor boy.jpg
minor boy.jpg

नाशिक : गंगापूर रोड परिसरात जून 2015 मध्ये चोरीसाठी मदतीला घेतलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर त्याचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व प्रत्येकी 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. 

असा घडला क्रूर प्रकार...
शंकर मदन झरे (रा. मोरे मळा, हनुमानवाडी, पंचवटी), बाळा ऊर्फ शिवाजी पोपट गांगुर्डे (रा. बारा खोली, गंगासागर कॉलनी, गंगापूर रोड) अशी या दोघांची नावे आहेत. 20 जून 2015 ला रात्री साडेदहाच्या सुमारास दोघांनी चोरी करण्यासाठी अल्पवयीन बालकाला एक हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून त्याला बरोबर झोपण्यासाठी नेले होते. मध्यरात्री दोघांनी त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करून नंतर त्याचा गळा चिरला. डोक्‍यावर दगड आणि लोखंडी रॉडने वार करून त्याचा निर्घृण खून केला होता. याप्रकरणी गंगापूर पोलिसांत खून, नैसर्गिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. वाय. यादव यांनी गुन्ह्याचा तपास करीत जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. 

दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 30 हजार रुपये दंडाची शिक्षा

जिल्हा व सत्र न्यायधीश एस. एस. नायर यांच्यासमोर खटला चालला. सरकार पक्षातर्फे ऍड. रेवती कोतवाल, ऍड. विद्या जाधव यांनी कामकाज पाहताना साक्षीदार, पंच, तपासी अधिकारी, पुरावे सादर केले. न्या. नायर यांनी दोघांना जन्मठेप व प्रत्येकी 30 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस एम. टी. दिकोंडा यांनी पाठपुरावा केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com