कृषी पर्यटन उद्योगात रोजगाराच्या अमाप संधी 

कृषी पर्यटन उद्योगात रोजगाराच्या अमाप संधी 

जुने नाशिक - कृषी पर्यटन उद्योगाला "अतिथी देवो भवः' संस्कृतीची जोड दिल्यास बेरोजगारांना रोजगाराची एक नवी संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मत कृषी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ पांडुरंग तावरे यांनी व्यक्त केले. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने संस्कृती ऍग्रो टुरिझमतर्फे झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. 

राज्य शासनाचा कोट्यवधींचा निधी महामंडळाला येतो. त्याचे काय केले? याविषयी संचालकही अंधारात असून, वर्षभरात लोकनियुक्त संचालक मंडळाची बैठक झालेली नसताना उद्या ठेवलेली बैठकच संशयास्पद वाटते. 
- माजी आमदार धनराज महाले, संचालक, आदिवासी विकास महामंडळ 

संस्कृती ऍग्रो टुरिझमच्या वतीने मखमलाबादच्या कृषी पर्यटन केंद्रावर "कृषी पर्यटनातील संधी' हा परिसंवाद झाला. याप्रसंगी श्री. तावरे म्हणाले, की वाढत्या शहरीकरणामुळे गावसंस्कृती लोप पावत आहे. युवक आधुनिकतेकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रोजगारातील कृषी क्षेत्राचे महत्त्वही युवक विसरत आहेत; परंतु त्याच आधुनिकतेचा वापर करून युवकांनी कृषी क्षेत्राचा विकास केला पाहिजे. हजारो युवकांना त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय दूध, भाजीपाला, दही, तूप व धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढण्यास मदत होईल. पर्यटन क्षेत्रातून त्यांची विक्री केल्यास शेतीमालाला भाव मिळण्यास मदत होईल. बचतगटाच्या महिलांनाही रोजगाराची संधी यातून मिळण्यास मदत होऊ शकेल. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांना कृषी पर्यटनातून सुमारे 20 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. दुसरीकडे, वर्षभरात सात लाख पर्यटकांनी कृषी पर्यटन केंद्रांना भेटी देऊन हजारो युवकांना उद्योजकतेचे साधन उपलब्ध करून दिल्याची माहिती देण्यात आली. 

पर्यटन विकास महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बढे-मिसाळ म्हणाल्या, की कृषी पर्यटनातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्याची कला आहे. शहरी व ग्रामीण जीवनाचा मिलाप कृषी पर्यटनातून साधला जातो. त्यातूनच नवनवीन पर्यटन योजना विकसित करता येऊ शकतात. हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राधाकिसन चांडक, मुरलीधर पाटील, प्रा. उमेश पठारे, दिलीपसिंह बेनिवाल, रोटरी क्‍लबच्या अध्यक्षा प्रिया नायडू, दिग्विजय मानकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com