सारंगखेडा : ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चारचाकीचे नुकसान

या अपघातामुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
Accident
Accidentesakal

सारंगखेडा (जि. नंदुरबार) : येथील तापी नदी पुलावर नवनाथ मंदिराजवळ सोमवारी दुपारी एक वाजता ट्रॅक्टर ( एमएच १२ आरके ३०४२) सारंगखेड्याकडून टाकरखेडा कडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीचा हूक तुटल्याने दोंडाईचा कडून शहादा कडे जात असलेल्या ब्रेझा चारचाकी ( एमएच ३९ एसी ७८७०) क्रमांकाच्या ट्रॉली आदळल्याने अपघात घडला.

यात ब्रेजा गाडीचे नुकसान झाले. या अपघातामुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली. या अपघातात कोणाला दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळतात सारंगखेडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट, पोलिस उपनिरीक्षक भगवान कोळी, श्री. चौधरी, गणेश गावित, विजय गावित, राजू गावित, शानाभाऊ ठाकरे घटनास्थळी दाखल होऊन जेसीबीच्या सहाय्याने ट्रॉली रस्त्यावरून बाजूला करत वाहतूक कोंडी सुरळीत केली.

Accident
दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला अमळनेरात पकडले
Accident
एकलहरे शिवारातून विद्युत साहित्य चोरीला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com