ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन शेतकऱ्याचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

खामखेडा (नाशिक) - शेतातून ट्रक्टरने कांद्याची घराकडे वाहतूक करत असतांना पिळकोस ताकळवण येथे उताराला ट्रॉलीचा हुक तुटले, त्यामुळे ट्रक्टर वरील नियंत्रण सुटुल्याने ट्रॅक्टर पलटी होऊन शेतकरी गोरख शिवाजी जाधव या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. गोरख जाधव यांच्या अपघाती निधननाने पिळकोस गाव व परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिळकोस ता कळवण येथील गोरख शिवाजी जाधव हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. स्वताच्या शेती व्यतिरिक्त दुसऱ्या शेतकऱ्यांची शेती वाट्याने करतात. वाट्याने करत असलेल्या गिरणा नदीकाठच्या कसाड भागाकडील गव्हाळी शिवारातील शेतातील कांद्याने भरलेला ट्रक्टर घरी वाहून नेत होते. पाठीमागून उताराला असलेली ट्रॉली घसरत ट्रॅक्टर चालक गोरक जाधव यांच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी झाले.

त्यावेळी त्यांची पत्नी व् मुलगा हे मोटरसायकलने ट्रॅक्टरच्या पाठीमाघुन शेतातून घरी जात होते. अपघात घडल्याने पत्नी व मुलाने आरड़ा ओरड केल्याने शेतकरी दीपक जाधव व समाधान आहेर या शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरट्रॉली बाजूला करत जखमी गोरख यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले.

त्यांच्या पश्यात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तापस कळवण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक आर.एस.सोनजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार जगन्नाथ सोनजे करत आहेत.

Web Title: The tractor trolley turns over the farmer's death