नांदगावात व्यवहार सुरळीत होण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

शेतमालाच्या रकमेच्या चुकवतीसाठी रोख रक्कम द्यायचा की धनादेश यावरून उफाळून आलेल्या वादावरून निर्माण झालेली कोंडी आजही सुटली नसल्याने परिणामी बाजार समितीमधील लिलावाचे कामकाज ठप्प झालेले होते.

नांदगाव : शेतमालाच्या रकमेच्या चुकवतीसाठी रोख रक्कम द्यायचा की धनादेश यावरून उफाळून आलेल्या वादावरून निर्माण झालेली कोंडी आजही सुटली नसल्याने परिणामी बाजार समितीमधील लिलावाचे कामकाज ठप्प झालेले होते. दरम्यान, व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नांदगावचे शंकर विभागाचे सहाय्य्क निंबंधक कांदळकर, नायब तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या भेटी घेत आपली बाजू मांडत असून, राहिलेले व्यवहार सुरळीत सुरु व्हावेत याकडे लक्ष वेधले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी सहकार विभागाकडे दिलेल्या निवेदनात बाजार समितीत निर्माण झालेल्या परिस्थितीचा शहरातील बाजारपेठेवर परिणाम झाला असल्याने शेतकरी व्यापारी व बाजार समिती प्रशासन यांच्या समन्वय साधत लिलाव सुरु करण्याची मागणी केली असून लिलाव सुरु झाले नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या सर्व परिस्थितीवर सहकार विभागाकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न करीत असल्याचे सहाय्य्क निबंधक कांदळकर यांनी सांगितले ज्या दिवशी खरेदी करू त्याच दिवसाचा धनादेश बाजार समितीच्या कार्यालयात देण्यासाठी व्यापारी तयार आहेत अशी भूमिका घेत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर पारख यांनी व्यापाऱ्यांची भूमिका स्पष्ट केली. 

पारख यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सहाय्य्क निबंधक नायब तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांच्या भेटी घेऊन देण्यात आले शिष्टमंडळात सचिन पारख, संदीप फोफलिया जयेश करवा समीर कासलीवाल सुमेर कासलीवाल ज्ञानेश्वर वाघ योगेश फोफलीया आनंद चोरडिया वाल्मिक गायके यज्ञेश कलंत्री सोमनाथ घोंगाने आदी खरेदीदार व्यापाऱ्यांचा समावेश होता.

व्यापाऱ्यांच्या निवेदनावर सहकार विभागाचे सहाय्य्क निबंधांक कांदळकर यांनी बाजार समितीचे सचिव अमोल खैरनार यांना पाचारण करीत कारवाईच्याबाजार समितीला लेखी  सूचना दिल्या. त्यात शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे वेळीच देण्यास तयार असतील तर त्याच दिवसाचा धनादेश बाजार समितीने स्वीकारावा यासाठी उचित निर्णय घ्यावा, असे कळविले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इशाऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज तिढा सुटण्यासाठी पुढाकार घेतला तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांनी बंद पडलेल्या कामकाजामुळे शेतकऱ्यांना आपला शेतीमाल अन्य ठिकाणी न्यावा लागत असल्याने बाजारपेठेवर होणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीची जाणीव करून दिली व तिढा सुटला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला 

Web Title: Traders Association officials try to resolve transactions in Nandgaon