There is no traffic police near the Gandhi statue, despite the 'no entry' sign, motorcyclists are rampant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

There is no traffic police near the Gandhi statue, despite the 'no entry' sign, motorcyclists are rampant

Nandurbar News : नो एन्ट्रीच्या फलकाजवळूनच वाहनांची वर्दळ; कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिस नियुक्तीची गरज

शहादा (जि. नंदुरबार) : शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या महात्मा गांधी (Gandhi) पुतळ्याजवळून खेतिया रस्त्याकडे जाण्यासाठी एकेरी वाहतूक आहे. (traffic police required as vehicle owner not following no entry board nandurbar news)

त्यासाठी शहादा पोलिस ठाण्यामार्फत बॅरिकेड लावून ‘नो एन्ट्री’चा फलक लावण्यात आला असला, तरीही नो एन्ट्रीत सर्रास वाहनधारक ये-जा करीत असल्याने त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे.

सध्या लग्नसराई सुरू असल्याने शहादा शहरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा सुरू असते. महात्मा गांधी पुतळ्याजवळ एकेरी वाहतूक आहे. काही वाहनधारक सर्रास एकेरी वाहतूक मार्गात आपले वाहन टाकतात.

एकेरी वाहतूक असल्याने समोरून येणारा वाहनधारक वेगाने येत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांना शिस्त लागावी म्हणून काही दिवस वाहतूक पोलिस नियुक्त करणे गरजेचे आहे.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

अधिकारी कर्तव्यदक्ष, पण...

शहरात वाहतुकीला शिस्त लागावी तसेच ट्रिपल सीट व वेगाने मोटारसायकल चालविणारे मोटारसायकलस्वार त्याचबरोबर बुलेटचा कर्कश आवाज करणारे सायलेन्सर, नो एन्ट्रीत वाहन टाकणारे वाहनचालक यांच्यावर कारवाईची विशेष मोहीम राबवून शहादा पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत कारवाई केली;

परंतु या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांची ही साथ हवी असते. अनेकदा वाहतूक पोलिस मात्र शहरातील नेमणुकीच्या जागेवर न थांबता इतरत्र आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र त्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते.

असाही खेळ चाले...

शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी शहरात अधूनमधून फेरफटका मारत परिस्थितीची पाहणी करत असतात.

या वेळी अधिकारी येण्याच्या वेळेस संबंधित वाहतूक पोलिस नेमणुकीच्या ठिकाणी कर्तव्यावर हजर असतात. मात्र अधिकाऱ्यांचा फेरफटका संपताच पुन्हा आपल्या कर्तव्याची जागा सोडल्याचे गांधी पुतळ्याजवळ ‘सकाळ’च्या पाहणीतून लक्षात आले.