‘ट्राय’च्या धोरणाने मनोरंजन आवाक्‍याबाहेर

Trai
Trai

जळगाव - टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) केबल ऑपरेटिंगच्या धोरणात बदल केला असून, तो येत्या आठवड्यापासून लागू होणार असल्याने ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड पडणार आहे. चॅनल निवडीचे स्वातंत्र्य देत असल्याचा ‘ट्राय’चा दावा असला, तरी किमान रक्कम आणि आवडीचे चॅनल्स हे गणित केले, तर ग्राहकांना न परवडणारी रक्कम अदा करावी लागणार आहे. त्यामुळे या धोरणास सर्व स्तरांतून होणारा विरोध आजही कायम आहे.

सद्य:स्थितीत भारतात ८३४ चॅनलची संख्या आहे. यात ३३५ ही पे चॅनल्स आहेत. उर्वरित ‘फ्री टू एअर’ आहेत. मात्र, टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) एक फेब्रुवारीपासून ग्राहकांना चॅनल निवडीचे स्वातंत्र्य प्रदान केले आहे. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनल पाहायचे, त्याचेच पैसे मोजावे लागणार आहेत. नव्या नियमांच्या अंमलबजावणीने ग्राहकांचे टीव्ही पाहणे स्वस्त होणार असल्याचे ‘ट्राय’चे म्हणणे आहे. प्रत्यक्षात मात्र ग्राहकांना अपेक्षित असणाऱ्या चॅनल्सचे दर अधिक असल्याने ग्राहकांचा ४० ते  ६० टक्के खर्च मनोरंजनावर अधिक होणार आहे.

असा असेल महिन्याचा खर्च
‘नेटवर्क फी’ म्हणून ग्राहकांकडून १३० रुपये आणि त्यावर २४ रुपये कर, असे एकूण १५४ रुपये भरावेच लागतील. यात ज्यांची गरज नाही अशा दूरदर्शनच्या २६ चॅनल्सचे पॅकेज असेल. शिवाय, अन्य चॅनल्सही यात असून, ते सर्व ‘ट्राय’ने निवडलेले आहेत. म्हणजे ग्राहकास गरज नसलेल्या या चॅनल्ससाठी १५४ रुपये विनाकारण भरावे लागतील. याशिवाय, आवडीचे चॅनल पाहण्यासाठी ग्राहकांना त्या- त्या चॅनलच्या ‘बेस प्राइज रेंज’नुसार पैसे द्यावे लागतील. चॅनलची ‘सबक्रिप्शन प्राइज रेंज’ साधारण १ ते १९ रुपये इतकी आहे. आपल्या पसंतीच्या २५ चॅनल्ससाठी ‘नेटवर्क कॅपेसिटी फी’ म्हणून अतिरिक्त २० रुपये द्यावे लागतील. 

असे आहे वाहिन्यांचे पॅकेज
‘स्टार समूहा’च्या वाहिन्यांच्या एकत्रित पॅकसाठी ४९ रुपये मोजावे लागतील. ‘झी’ समूहाचे फॅमिली पॅक ४५ रुपये असून, मराठी फॅमिली पॅक ३९ रुपये आहे. ‘सोनी’ समूहाने ‘हॅप्पी इंडिया पॅक’अंतर्गत सिल्व्हर, प्लॅटिनम अशी वर्गवारी करत सर्वसाधारण पॅकची किंमत ३१ रुपये असून, प्लॅटिनमची किंमत ९० रुपये आहे. ‘कलर्स’ने ‘कलर्सवाला पॅक’ असे नाव देऊन एका दिवसासाठी १ रुपया अशी बेरीज करत २० वाहिन्यांसाठी २५  रुपये दर ठेवला आहे.

ग्राहकांनी ‘आला कार्ट’ सिस्टिमचा वापर करावा. यात आपल्याला पसंतीचे चॅनल निवडण्याचा पूर्ण अधिकार असेल. त्यासाठी  ग्राहकांना तेवढेच पैसे मोजावे लागतील.
- विजय चंदेले, अध्यक्ष, केबलचालक- मालक संघटना

सुरवातीला केबल होती, त्यावेळी साधारण १५० रुपये सरासरी खर्च असायचा. डिश टीव्ही आल्यानंतर २५० रुपये महिन्याचा रिचार्ज करावा लागत होता. आता नवीन नियमावलीनुसार निवडक चॅनल्स पाहण्यासाठी ३५० रुपये महिन्याला खर्च येणार आहे.
-  कुंदन तळेले, ग्राहक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com