नांदगाव : रेल्वेचे चाक निखळले; सुदैवाने जीवितहानी नाही

नांदगाव : रेल्वेचे चाक निखळले; सुदैवाने जीवितहानी नाही

नांदगाव : बिहारच्या बरौनी स्थानकातून कुर्लाच्या लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लोकमान्य टिळक - बरौनी ( 02062 up ) समर स्पेशल वातानुकूलित गाडीला अपघात झाला. गार्डच्या डब्याच्या अगोदरचा डब्याचे चाक तुटून पडल्याने ही दुर्घटना घडली. सुदैवाने यामध्ये रेल्वेतील प्रवासी बालंबाल बचावले.

या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मिश्रा यांच्या सतर्कतेमुळे भरधाव वेगातली गाडी थांबली. एका मोठ्या संकटातून प्रवासी बचावले. मध्य रेल्वेच्या देखभाल दुरुस्ती पथकाने नादुरुस्त बोगी बाजूला करून नांदगाव स्थानकातील लूप साईडला गाडी आणली. या घटनेमुळे भुसावळ ते नाशिक दरम्यान धावणाऱ्या अनेक गाड्यांचा खोळंबा झाला. तसेच तीन तासांच्या तांत्रिक दुरुस्तीनंतर खोळंबून पडलेली वाहतूक दुपारनंतर पूर्वपदावर आली.

विशेष म्हणजे बिहारच्या बरौनी स्थानकातूनच निघालेल्या या वातानुकूलित गाडीचा प्रवासच मुळातच रखडत सुरु झाला. नियोजित वेळेपेक्षा तब्ब्ल नऊ तासांहून अधिक काळापासून विलंबाने धावणाऱ्या या गाडीच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींबाबत रितू राज,नवीन झा,बी एच शंभू सुभाष गुप्ता यांच्यासह अन्य काही प्रवाशांनी ट्विटरवर तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही. 

गाडीला विलंब व त्यातील आसनव्यवस्था व अस्वच्छतेबाबत या तक्रारी होत्या. आज पहाटे भुसावळ स्थानकातून निघालेली ही गाडी इगतपुरीच्या थांबणार होती. मात्र, पिंपरखेड स्थानक सोडून नांदगाव यार्डजवळ येत असताना डॉक्टरवाडी बाभूळवाडीदरम्यान पोळ नंबर २२० जवळ या गाडीच्या गार्डच्या डब्याजवळील बोगी क्रमांक बी १५ च्या चाकांपैकी एका चाकाचा अर्ध्याहून अधिक भाग घर्षणातून झालेल्या अतिउष्णतेमुळे  तुटून पडला. त्यातून मोठा आवाज होत भरधाव वेगात धावत असलेली गाडी हेलकावे खाऊ लागल्याने प्रवाशांत एकच घबराट उडाली.

यादरम्यान गँगमन वाल्मिक बोराळे यांनीही हा प्रकार बघितला व त्यांनी तुषार पांडे व अन्य रेल्वेच्या वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. याच बोगीतून प्रवास करीत असलेल्या ओमप्रकाश मिश्रा यांनी साखळी ओढली .त्यामुळे गाडी थांबली व त्यांनी गार्डच्या लक्षात बोगीचे अर्ध्यात तुटलेले चाक दाखविले. गार्डने चालकाला लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या लोकमान्य टिळक - बरौनी ( 02062 up ) समर स्पेशल वातानुकूलित गाडीच्या या अपघाताचे वृत्त नांदगाव स्थानकात कळविण्यात आले.

स्थानक प्रबंधक अग्रवाल यांनी त्यासाठी वेगळा प्लॅटफार्म उपलब्ध करून दिला. मनमाडचे वाणिज्य अधिकारी नाना भालेराव यांनी थांबलेल्या गाडीतल्या सर्व प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी,चहा बिस्किटे उपलब्ध करून दिले. या गाडीमागे गोवा,सचखंड पटना महानगरी अशा चार गाड्या पाठोपाठ धावत होत्या. गाडीने मन्याड नदीवरील ब्रिटिशकालीन पूल ओलांडला व काही किमी अंतरावर हा प्रकार घडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com