एटीएम लुटीसाठी संशयीत सातपूर पोलिसांच्या जाळ्यात

एसीपी शांताराम पाटील व सातपूर पोलिस पाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या समवेत कर्मचारी व अटक करण्यात आलेले संशयीत
एसीपी शांताराम पाटील व सातपूर पोलिस पाण्यातील वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या समवेत कर्मचारी व अटक करण्यात आलेले संशयीत

सातपूरः येथील अशोक नगर परीसात मध्यरात्री एटीएम लुटण्याचा हेतूने आले आसता त्याच वेळी पोलिस गस्त घालत आसलेल्या पोलिसांनी संशयीना हालचाली लक्षात येताच ताब्यात घेतल्याची माहिती साह्यक पोलिस आयुक्त शांताराम पाटील व वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी पत्रकार परिषदेत आज (शुक्रवार) दिली.

आज मध्य रात्रीच्या सुमारास एका बिना नंबरची मोटर सायकलवर तिन तरूण संशयीत रित्या फिरत असल्याची माहिती मिळताच सातपूर पोलिस ठाण्याचे पीएसआय संदीप वराडे, किरण सानप, ह. शिदपुरे हे गस्त घालत आसताना तिन युवक एसबीआयच्या एटीएम जवळ तोडाला रूमाल बाधून आधांरात उभे होते. त्यांच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना हाटकण्याचा प्रयन्त करताच ते पळायला लागले. पोलिसांनी पाठलाग करत त्यांना ताब्यात घेतले. विचारना केली आसता उडवा उडवीचे उतरे देवू लागले. त्यांचे मोबाईल तपासले आसता चोरी करताना कुलूप कसे तोडावे याचा व्हिडीओ दिसला. या नंतर त्याची बॅग चेक केली आसता त्यांच्याकडे फायटर तसेट एटीएम तोडण्याचे साहीत्य मिळून आले. सदर संशयीत हे एटीएम लुटण्याचा प्रयन्तात होते हे लक्षात आल्याने सचिन रामभाऊ विश्वकर्मा (वय 19 रा. रामवाडी), संजन बबव वड (वय 26 रा. रामवाडी) तर तिसरा संशयीत हा अल्पवयीन आहे. या तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे. सदरचा तपास वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय संदीप वराडे व त्यांची टिम करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com