झाडे न लावणाऱ्यांना आता कारावास - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर संबंधिताने पाचपट झाडे लावण्याचा नियम आहे. पण पूर्णवेळ यंत्रणेअभावी त्याचे उल्लंघन होते. त्यावर उपाय म्हणून वृक्षतोडीनंतरही झाडे न लावणाऱ्यांना दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले.

नाशिक - विकासकामांसाठी झाडे तोडल्यानंतर संबंधिताने पाचपट झाडे लावण्याचा नियम आहे. पण पूर्णवेळ यंत्रणेअभावी त्याचे उल्लंघन होते. त्यावर उपाय म्हणून वृक्षतोडीनंतरही झाडे न लावणाऱ्यांना दंडासह कारावासाच्या शिक्षेची तरतूद केली जाईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. 

राज्यस्तरीय वरिष्ठ वन अधिकाऱ्यांच्या दोनदिवसीय परिषदेला येथील सरकारी विश्रामगृहात सुरवात झाली. या वेळी ते बोलत होते. राज्यात यंदा ३३ कोटी वृक्षारोपण केले जाणार आहे. या संदर्भात करण्यात आलेली तयारी, त्यासाठीची क्षेत्र निश्‍चिती, खड्डे याचा आढावा मुनगंटीवार यांनी घेतला. मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अनुराग चौधरी, उमेश अग्रवाल, डॉ. रामबाबू आदींसह मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Plantation Crime Sudhir Mungantiwar