एक झाड जगवा 500 रुपये सूट मिळवा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कासारे (जि. धुळे) - वृक्षाचे एक रोप लावून त्याचे संगोपन करा आणि वर्षभराने घरपट्टीत 500 रुपयांची कर सवलत मिळवा, अशी अभिनव कल्पना कासारे ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. राज्यात बहुधा प्रथमच सुरू झालेल्या या अनोख्या योजनेला आता ग्रामस्थ कशा पद्धतीने प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरोगामी विचारसरणीच्या कासारे, मालपूर (ता. साक्री) येथील लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थांतर्फे सातत्याने नवनवीन विधायक सामाजिक उपक्रम राबविले जातात. वाढत्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांपूर्वीच एका कुटुंबाने विवाह समारंभांत "बेटी बचाव- बेटी पढाव', वृक्षलागवड, पाणी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन, असे विविध संदेश देत सामाजिक बांधिलकी जोपासली. आता येथील ग्रामपंचायतीने "हरित गाव- स्वच्छ गाव- निर्मल गाव', पर्यावरण समृद्ध गाव व्हावे म्हणून ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव योजना हाती घेतली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tree Plantation Life 500 rupees discount