VIDEO : निमित्त आदिवासींचे आराध्य दैवत डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाचे.....

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

वेळूच्या काठी भोवती, मुळासकट उपटलेली झेंडूची झाडे,देवअंबाडी , ऊस , देवकरडू ,ही झाडे अर्धीवर राहतील अशा तऱ्हेने रोवतात त्याच्याभोवती खुळखुळ्याची काठी मोरपिसांचा कुच्चा ,पावरी (वाळलेल्या भोपळ्या पासून बनविलेले एक वादय)ठेवतात. या व्रताची परिपूर्ण माहीती असलेला भगत येथे सव्वाशे पुंजा टाकून थोंबाची पूजा करतो. पुजा अर्चा आटोपल्यावर भगत डोंगऱ्यादेवाच्या कथेस प्रारंभ करतो.

नाशिक : विविध  प्रकारची आदिवासी लोकगीते, आदिवासी बांधवांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन् तोंडातून भूररर..! असा आवाज आदिवासी भागातील रानावनात बरोबरच परीसरातील गावागावांत घुमत आहे. निमित्त आहे आदिवासींच्या बांधवाचे आराध्य दैवत असलेल्या डोंगऱ्यादेवाच्या (भाया) उत्सवाचे. 

आदिवासींचा सर्वात मोठा डोंगऱ्यादेवाच्या उत्सव
आदिवासींचा सर्वात मोठा व धार्मिकदृष्ट्या महत्वाचा असलेल्या डोंगऱ्यादेवाच्या उत्सवास दिंडोरी सह सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यात सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावाच्या अगर विभागाच्या प्रथेनुसार आदिवासी डोंगऱ्यादेव हे व्रत तिन किंवा पाच वर्षांनी पाळतात.नियोजित वर्षाच्या मकशी म्हणजे मार्गशिर्ष महिण्याच्या अमावस्येला हे व्रत सुरु होते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला त्याची सांगता होते. साधारणतः पंधरा दिवस पाळले जाणारे हे व्रत आदिवासी अलीकडे आठ दिवस पाळतात.ज्या गावात हे व्रत असते त्या गावातील आदिवासी या व्रताची महिनाभरापासून तयारी करतात. व्रताच्या पहिल्या दिवशी व्रत घेणारे सर्व लोक आणि पाच माऊल्या कन्सरा, वाघंब्रा, झेलाशेवर ,फुलाशेवर, ताराशेवर यांना उपवासी ठेवले जाते. सायंकाळी सर्व स्नान करून आपल्या गावाच्या रितीरीवाजा प्रमाणे गावातील पाटलाच्या घरी अथवा मंदिरा समोर जमा होतात. येथे गावचा पाटील, भगत, मुधानी (मुख्य माऊली), खुट्या (डोंगऱ्यादेवाचा प्रमुख), पावरकर , कथकरी यांच्या हस्ते थोंब ठोकले जाते. 

Image may contain: one or more people, people standing, people walking, hat and outdoor

डोंगऱ्यादेवाच्या कथेस प्रारंभ...
वेळूच्या काठी भोवती, मुळासकट उपटलेली झेंडूची झाडे,देवअंबाडी , ऊस , देवकरडू ,ही झाडे अर्धीवर राहतील अशा तऱ्हेने रोवतात त्याच्याभोवती खुळखुळ्याची काठी मोरपिसांचा कुच्चा ,पावरी (वाळलेल्या भोपळ्या पासून बनविलेले एक वादय)ठेवतात. या व्रताची परिपूर्ण माहीती असलेला भगत येथे सव्वाशे पुंजा टाकून थोंबाची पूजा करतो. पुजा अर्चा आटोपल्यावर भगत डोंगऱ्यादेवाच्या कथेस प्रारंभ करतो. या कथेत भानसऱ्या सर (जंगलातील एका झाडाची काडी )उभा करतात. तो सर दोन्ही हाताच्या बोटाने हळूवार ओढल्यास त्याचे कंपन होउन , तिचा अतिशय मधूर असा सुर निघतो ,त्याच्या सुरात सुर मिसळून गायीली जाते.भगत सुरवातीला पाच नमन म्हणून कथेस प्रारंभ करतो, झिलक्या त्याला साथ देतो. 

हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

Image may contain: one or more people, people walking, people standing and outdoor

गावकऱ्यांना दर्शनाचे आमंत्रण
या कथेतून डोंगऱ्यादेवांच्या सर्व माऊल्या, भूतांची नावे घेताच व्रत घेतलेल्या लोकांच्या अंगात हवा येते. या उत्सवात आदिवासी युवकांनी आपल्या म्होरक्यासह गटागटाने आजूबाजूच्या गावात जाऊन देवाची गीते गात व गावकऱ्यांना दर्शनाचे आमंत्रण दिले. गावोगाव जाऊन देवीची गर्जना करणाऱ्या या युवकांना भाया म्हटले जाते. गावातील नागरिक धान्य, तेल, मीठ अथवा पैसे जे देतील ते घेऊन या जमा केलेल्या धान्य तेलातून डोंगऱ्यादेवाचा नैवद्य केला जातो. या पंधरा दिवसात आदिवासी बांधव उपवास करतात. उपवासात फक्त भुईमूग शेंगा, गूळ, लाह्या हा त्यांचा आहार असतो. या उत्सवकाळात आदिवासी महिला कुंकू लावत नाहीत, जेवणात तेलाचा वापर करत नाही, पाट्यावर मसाला वाटत नाहीत, दूध, भाजीत मीठ खात नाहीत, भाजीपाला खात नाही, आहारात फक्त डाळी खातात. उत्सवाच्या सुरुवातीला प्रत्येक कुटुंब आपल्या घरातील सदस्य हा या उत्सवातील मुख्य जोखीमदार भगत याच्या स्वाधीन करतात. उत्सव सुरुवातीपासून ते हा उत्सव सुरळीत पार पडेपर्यंत या सर्व भायांची जबाबदारी भगतावर असते. 

Image may contain: one or more people, people dancing and outdoor

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

वनदेवता प्रसन्न झाल्यावर डोंगर जागा देते
या उत्सवाचा प्रारंभापासूनचा विधी, पौर्णिमेच्या दिवशी गड घेण्यासाठी गेल्यावर वनदेवता प्रसन्न झाल्यावर डोंगराने दर्शन देण्यासाठी डोंगर जागा देते व तेथून रात्री घरी सुखरूप येईपर्यंत भगत हा सर्वांचा जिवाचा जोखीमदार असते. पौर्णिमेला शेवटच्या दिवशी डोंगरावर गड घेण्यासाठी गेले असता डोंगरावर दिवे लावले जातात. भगत या जागी लाल कोंबडा जिवंत सोडतो तर लाल बोकडाला फक्त मानवतो येथे मात्र बोकड बळी दिला जात नाही .काही ठिकानचे डोंगऱ्यादेवाचे गौळ डोंगराच्या अत्यंत अवघड कपारीत, गुहेत आहेत. अशा गौळात घूसणे म्हणजे एक प्रकारे दिव्य परिक्षाच असते. परंतु या कालावधीत गौळात घूसने माऊल्यांना फारसे अवघड नसते. काही गौळांचे द्वार इतर दिवसांपेक्षा या दिवशी आकाराने मोठे होत असल्याचे सांगतात. ही सुध्दा एक प्रकारे डोंगऱ्यादेवांचीच कृपा आहे अशी आदिवासींची श्रद्धा आहे. 

नक्की बघा > PHOTOS : अनेक शेळ्या फस्त करणारा 'तो'...पारेगावात दिसलाच शेवटी..नागरिकांमध्ये घबराट.

गौळाला नारळ हळूच ठोकतात, फोडत नाही
माऊल्यांचे दर्शन झाल्यानंतर ओटीसोबत घेतलेला नारळ येथे गौळाला हळूच ठोकतात, फोडत नाही. उत्सवाच्या सांगता दरम्यान व्रत घेतलेल्यांचे अंगातील वारे नष्ट व्हावे म्हणून आपापल्या वाऱ्यानुसार बोकड , कोंबडयाचा बळी दिला जातो.गौळाला मान देऊन आनलेला लाल बोकड, कोंबडा धानीवर बळी देतात. शिवारातील रानवा देवाला धवळा कोंबडा जिवंत सोडतात. भौऱ्याभूत - खैरा कोंबडा, गाव माऊल्या - लाल कोंबडा, लाल कोंबडी, काळभूत- लाल कोंबडा, म्हसोबा फिरंग्या कोंबडा, हिरवा देव - काळी पाठ(बकरी) आदी वस्तूंचा बळी देण्याचा कार्यक्रम होतो. लोकवर्गणीतून खरेदी केलेल्या सर्व बोकडांना बळी देऊन रात्री सर्व गावाला गाव जेवण दिले जाते .याला भंडारा असे म्हणतात.दुसऱ्या दिवशी वाडी वस्तीवरुन मागितलेल्या कमारीचे ,नारळ प्रसादाचे सर्वाना वाटप करून टोप्या घालण्याचा कार्यक्रम होतो.अशाप्रकारे आदिवासींच्या डोंगऱ्यादेवाच्या व्रताची सांगता होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal community celebrates hill festival celebrates Nashik Marathi News