PHOTOS : दवंडी म्हणजे 'त्यांची' ब्रेकींग न्यूज ! यंत्रयुगातही परंपरा कायम....  

गोविंद आहिरे : सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यासह पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, त्र्यंबकेश्‍वरसह अनेक गावात जुनी दवंडी देण्याची पध्दत व विविध आगळ्या वेगळ्या प्रथा आजही टिकून आहेत. यात प्रमुख निर्णयांसाठी मारुती मंदिर पारावर जमून निर्णय घेणे, अंत्ययात्रा काढत आहोत हा संदेश देण्यासाठी फटाके फोडणे, अंत्यविधी होत असताना चिवडा वाटप करणे अशा अनेक प्रथा ग्रामीण बाज कायम असल्याची साक्ष देतात. 

नाशिक : दवंडी देण्यासाठी ऐका हो ऐका .... ढुम ढुम ढुमाक. ढुम ढुम ढुमाक यासह हलगीचा आवाज काळानुरुप क्षीण झाला आहे. यांत्रिकयुगात नवीन साहित्य साधने आले. रिक्षा स्पिकरमुळे दवंडी देखील अत्याधुनिक झाली. जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यासह पेठ, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, ञ्यंबकेश्‍वरसह अनेक गावात जुनी दवंडी देण्याची पध्दत व विविध आगळ्या वेगळ्या प्रथा आजही टिकून आहेत. यात प्रमुख निर्णयांसाठी मारुती मंदिर पारावर जमून निर्णय घेणे, अंत्ययात्रा काढत आहोत हा संदेश देण्यासाठी फटाके फोडणे, अंत्यविधी होत असताना चिवडा वाटप करणे अशा अनेक प्रथा ग्रामीण बाज कायम असल्याची साक्ष देतात. 

महत्वाचा व तातडीचा निर्णय असल्यास वेळेची प्रतिक्षा नाही
दवंडी ही पुर्वापार चालत आलेली प्रथा आहे. रात्री उशिरा किंवा गावातील वातावरण शांत असताना प्रामुख्याने दवंडी दिली जाते. महत्वाचा व तातडीचा निर्णय असल्यास त्यासाठी कुठल्याही वेळेची प्रतिक्षा करण्यात येत नाही. गावातील एखादा प्रमुख निर्णय, सण-उत्सव तसेच काही निर्णय घ्यावयाचा असल्यास मोठ्या भाऊबंदकीमधील तंटा असल्यास पारावर एकत्र येऊन निर्णय घेण्याची प्रथा आहे. आदिवासी भागात रेशन दुकानदाराकडे धान्य आल्याची देखील दवंडी दिली जाते. थोडक्‍यात या भागात दवंडी म्हणजे अत्याधुनिक युगातील ब्रेकींग न्यूज आहे. 

Image may contain: 1 person, smiling, standing and outdoor

हेही वाचा > आई फोनवर बोलत होती..अन् बाळ रांगत गेलं बाथरुममध्ये....नंतर आई येऊन बघते तर काय.....

ग्राम दैवताच्या साक्षीने निर्णयाची प्रथा 
आदिवासी भागात महत्वाचे निर्णय, गावातील विकासकामे, सण साजरा करण्यासाठी एकत्रित निर्णय घेतला जातो. या वेळी एकोप्याचे दर्शन घडते. प्रामुख्याने ग्रामदैवताला साक्षी ठेवून पारावरच असे निर्णय घेतले जातात. सार्वजनिक कामासाठी किंवा नवीन मंदिरासाठी लोकवर्गणी करण्यासाठी देखील पारावर ग्रामस्थ जमतात. फटाके म्हणजे आनंदोत्सवाचे लक्षण आहे. ग्रामीण भागात असंख्य ठिकाणी अद्यापही अंत्यविधीची तयारी सुरु झाली आहे. अंत्ययात्रा निघणार आहे हा संदेश देण्यासाठी सुतळी बॉम्बसारखे मोठे फटाके उडविले जातात. अग्निडागाचा संस्कार पार पडल्यानंतर चिवडा व अल्पोपहार देण्याची प्रथा आजही कायम आहे. आदिवासी भागात ग्राम रक्षणासाठी तसेच कामकाजानिमित्त रानावनात फिरणाऱ्या आदिवासी बांधवांना रोज संकटांचा सामना करावा लागतो. यात त्यांना इजा पोहचू नये यासाठी देवदेवतांच्या पूजा व भंडारा करण्याची प्रथा कायम आहे. 

Image may contain: one or more people, people walking, people standing and outdoor
हेही वाचा > मळ्यात गेलेले आजोबा-नातू परतलेच नाही...शोध घेतल्यावर ग्रामस्थांना धक्का...

ग्रामदैवताजवळ झालेला निर्णय सर्व संमतीने मान्य केला जातो
आदिवासी भागात दवंडीची प्रथा अद्यापही कायम आहे. महत्वाचे निर्णय यामुळे लक्षात येतात. ग्रामदैवताजवळ झालेला निर्णय सर्व संमतीने मान्य केला जातो. एकोपा राहण्यासाठी पारावरील निर्णय हातभार लावतो. पारावरील बैठकीतून अनेक कामे मार्गी लागतात. - शांताराम पवार, ग्रामपंचायत सदस्य, नरकोळ

पाहा > PHOTOS : कोंबडा माशाची मिजासच भारी!...'इतक्या' दराचा यंदा तुर्रा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribal community still follows Dawandi Tradition in the digital age Nashik Marathi News