आदिवासी नोकरी फसवणुकीतील संशयितांच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

नाशिक - आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली. आदिवासी विकास विभागात प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी फसवणूक केल्याप्रकरणी संशयित हेमंत पाटील, सुरेश पाटील यांच्यासह नऊ संशयितांविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार हेमंत पाटील, सुरेश पाटील, तुकाराम पवार आणि उदयनाथ सिंग या चौघांना अटक केली होती.

नाशिक - आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ बनवून त्याद्वारे सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांच्या कोठडीत एक दिवसाची वाढ करण्यात आली. आदिवासी विकास विभागात प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी फसवणूक केल्याप्रकरणी संशयित हेमंत पाटील, सुरेश पाटील यांच्यासह नऊ संशयितांविरोधात मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी या टोळीचा मुख्य सूत्रधार हेमंत पाटील, सुरेश पाटील, तुकाराम पवार आणि उदयनाथ सिंग या चौघांना अटक केली होती. यापैकी तुकाराम पवार व उदयनाथ सिंग यांना गेल्या गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावली होती; तर हेमंत पाटील व सुरेश पाटील यांना चार दिवसांची कोठडी दिली. त्याची मुदत आज संपल्याने दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. 

Web Title: tribal fraud case

टॅग्स