आदिवासी नोकरी फसवणुकीतील नऊ संशयित फरारीच

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

नाशिक - आदिवासी विकास विभागाचे बनावट संकेतस्थळ बनवून सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या मुख्य सूत्रधारासह दोघांच्या कोठडीची मुदत रविवारी (ता. 15) संपत आहे. गेल्या आठवडाभरात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु या टोळीतील नऊ संशयितांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

आदिवासी विकास विभागात प्राथमिक शिक्षकाच्या नोकरीसाठी सुशिक्षित बेरोजगाराची साडेदहा लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी गुन्हे शाखेने चौघांना तत्काळ अटक केली होती. त्यापैकी मुख्य सूत्रधार हेमंत पाटील, सुरेश पाटील यांच्या कोठडीची मुदत उद्या संपत आहे. अन्य दोघांना न्यायालयाने गेल्या गुरुवारीच मध्यवर्ती कारागृहात रवाना केले होते. तपासामध्ये पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, त्यासंदर्भात पोलिस सखोल तपास करत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: Tribal job cheater nine suspected fugitive