आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आता बोलीभाषेत पुस्तके

सचिन पाटील
शुक्रवार, 20 जुलै 2018

शिरपूर - दुर्गम आदिवासी भागातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना विषयांचे आकलन जलदरीत्या व्हावे, या हेतूने पहिली ते तिसरीची क्रमिक पुस्तके आदिवासी बोलीभाषेत अनुवादित केली जात आहेत. पुण्याच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे हा उपक्रम राबविला जात असून, अनुवादासाठी जिल्ह्यातून सात शिक्षकांची निवड झाली. या शिक्षकांचे प्रशिक्षण पुणे येथे सुरू आहे.

आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. शालेय जीवनाला प्रारंभ करताना नागरी मराठी भाषेतून अध्ययन करतेवेळी हे विद्यार्थी आकलनात मागे पडतात. त्यामुळे त्यांच्यात शिक्षणाविषयी न्यूनगंड तयार होतो, असे आढळून आल्याने पहिली ते तिसरीची पुस्तके आदिवासी बोलीभाषांतून उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प प्रस्ताव संस्थेने धुळे जिल्हा आदिवासी प्रकल्प विभागाकडे दिला होता. ही पुस्तके जिल्ह्यातील पावरा, मावची, कोकणी आणि भिलोरी भाषांमध्ये अनुवादित केली जातील.

Web Title: tribal student mother tongue books