बदलत्या हवामानाचा मोहफुलांना फटका; कल्पवृक्ष कोमजला

विजय पगारे
गुरुवार, 12 एप्रिल 2018

इगतपुरी : आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहफुलांच्या हंगामालाही बदलत्या हवामानाचा फटका बसला असून यावर्षी आंबेमोहोर आला नसल्याने त्याचा परिणाम मोहफुलांवरही झाल्याचे दिसून येत आहे. इगतपुरी, कसारा घाट, त्र्यंबकेश्वर, हरसुल, पेठ सुरगाणा व इतरत्र परिसरात मोहफुले वेचून मजूर आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात.

मोहाच्या झाडाचे जवळपास सर्वच भागांचा वापर होत असल्याने त्यास आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून संबोधले जाते. मोहाच्या पानापासून पत्रावळी,फुलांपासून घरगुती मद्य तर फळ ( टोळमी) पासून खाद्यतेल तयार केले जाते.मोहाचे लाकूड सरपण व इतर कामासाठी वापरले जाते.

उन्हाळ्यात या झाडाला पिवळी फुले येतात रानात असलेली फुले वेचण्यासाठी आदिवासी अबालवृध्द भल्या पहाटे जंगलाची वाट धरत असतात मोहाची फुले वाळवून विक्री केली जातात. शिवाय काही प्रमाणात या फुलांचा साठाही करून ठेवला जातो.

घरात धार्मिक कार्य किंवा लग्नसमारंभ असल्यास या मोहफुलापासून आयुवेर्दिक मद्य तयार करून आलेल्या पाहुण्यांना पाहूणचार करण्याची पध्दत आहे. आजही आदिवासी भागात नदीकाठावर अशा प्रकारच्या घरगुती दारू पाडण्याचे उपकरणे दिसून येतात.

आंबेमोहरावर मोहमोहर अवलंबून
दरवर्षी आंब्याच्या मोहर किती प्रमाणात येतो यावर मोहाचा हंगाम अवलंबून असतो यावर्षी मध्यंतरी ओखी वादळामुळे आंब्याच्या मोहर गाळून पडल्याने आंब्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होणार असल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून याचा परिणाम मोहफुलांवरही झाल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी मोहाच्या झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असतांना या वर्षी मात्र एकेक फुल वेचावे लागत असल्याचे दिसत आहे.

प्रक्रिया केंद्र सुरू करण्याची मागणी
तालुका निसर्गसंपतीने अजूनही नटलेला असला तरी या भागात उत्पादीत झालेल्या वस्तूंवर प्रक्रिया उद्योग नसल्याने स्थानिक नागरिकांना रोजगार मिळू शकत नाही.आंबे,मोह,करवंद, आवळा,टेंबूर यासारख्या रानमेव्यावर प्रक्रिया केंद्र सुरू झाल्यास स्थानिकांना रोजगार व उत्पादित मालाला भाव मिळू शकेल.शिवाय रोजगाराअभावी होणारे स्थलांतर रोखण्यास मदत होऊ शकेल.

Web Title: Tribals facing problems due to changes in environment