ट्रकचालकाने चौघांना लिफ्ट दिली खरी....पण त्यांचा 'कट' चालकाला समजायला फार उशीर झाला होता..

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 December 2019

महामार्गावरील वाडिवऱ्हे येथे ग्लोबल कंपनीत बिगारी काम करणारे चौघे संशयित काम करून घरी जाण्यासाठी रविवारी (ता.22) मध्यरात्री बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिकडे येण्यासाठी महामार्गालगत उभे होते. संशयितांनी ट्रकला हात दिला, म्हणून ट्रकचालक कुरेशी यांनी ट्रक थांबविला. चौघेही संशयित ट्रकमध्ये बसले.

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी येथे मध्यरात्रीला ट्रकचालकाला मारहाण करून पळविला ट्रक मुंगसरा येथे पलटी झाला. त्यामुळे ट्रक लुटीचा डाव संशयितांवर उलटला आणि ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने चौघांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोधून काढत जेरबंद केले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून संशयितांनी गेल्या रविवारी (ता.22) मध्यरात्री ट्रक पळविला होता. 

अशी घडली घटना...
महामार्गावरील वाडिवऱ्हे येथे ग्लोबल कंपनीत बिगारी काम करणारे चौघे संशयित काम करून घरी जाण्यासाठी रविवारी (ता.22) मध्यरात्री बारा-साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिकडे येण्यासाठी महामार्गालगत उभे होते. संशयितांनी ट्रकला हात दिला, म्हणून ट्रकचालक कुरेशी यांनी ट्रक थांबविला. चौघेही संशयित ट्रकमध्ये बसले. विल्होळी येथे ट्रक आला असता, संशयित संदीप गायकवाड याने त्याच्याकडील जेवणाच्या डब्याने चालक कुरेशी यांच्या डोक्‍यात मारला आणि तिघांनीही मारहाण करून कुरेशी यांना जैन मंदिराजवळ उतरवून देत ट्रक पळवून नेला. ट्रकचालक करेशी यांनी नाशिक तालुक पोलीस ठाणे काढून तक्रार दिली. दरम्यान, संशयितांनी अंबड-गिरणारे मार्गे मुंगसऱ्याकडून घेऊन जात असताना ट्रक पलटी झाला. ट्रकमधील औषधीसाहित्य रस्त्यावर पडले. दुसऱ्या दिवशी परिसरातील नागरिकांनी तालुका पोलिसांना खबर दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संशयित पसार झाले होते. 
 
Image may contain: 13 people, including Sawant Ganesh Hnumant and Jayesh Anant Tare, people standing and shoes

सीसीटीव्हीचे फुटेज ठरले महत्त्वाचे 
पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या पथकाने महामार्गावरील ठिकठिकाणी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये चौघे संशयित कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी शोध सुरू केला होता. मुंगसरा शिवारात ट्रक पलटी झाल्याने त्यात ते चौघेही संशयित जखमी झाले होते. पोलिसांनी तपास मुख्य संशयित संदीप गायकवाड यास चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चौघांनीही पोलिसांनी अटक केली. सदरची कामगिरी सहायक निरीक्षक स्वप्नील राजपुत, सागर शिंपी, सहायक उपनिरीक्षक गुरुळे, दिवटे, शिलावट आदींच्या पथकाने केली. 

हेही वाचा > "लॉजवर चल जाऊ" चक्क महिला पोलिसाला 'त्याने' हातवारे केले....पुढे... ​

हे आहेत ते चौघे..ज्यांनी पळविला ट्रक
संदीप शिवाजी गायकवाड (32), आकाश शिवाजी गायकवाड (22, दोघे रा. वेलुंजे, ता. त्र्यंबकेश्‍वर. हल्ली रा. महिरावणी ता. त्रंबकेश्वर), राहुल कारभारी जाधव (22, रा. मुळेगाव, ता. त्र्यंबकेश्‍वर), गणेश पाराजी गांगुर्डे (28, रा. तळेगाव काचुर्ली, ता. त्रंबकेश्वर. हल्ली रा. भंदुरेवस्ती, सातपूर) अशी संशयितांची नावे आहेत. निसार अहमद शाकीर कुरेशी (58, रा. नयेगाव, भिवंडी, जि. ठाणे) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या रविवारी (ता.22) ट्रकमधून (एमएच 04 सीए 7764) मेडिकल साहित्य असा 16 लाख रुपयांचा माल घेऊन चंद्रपूरकडे निघाले होते. 

हेही वाचा > मुलीची देहविक्री...भरपूर पैसा..असे स्वप्न आईवडिलांचे..पण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck escaped from four criminals at vilholi Nashik Marathi News