Dhule News : शिरपूर टोलनाक्यावर ट्रक उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

overturned truck

Dhule News : शिरपूर टोलनाक्यावर ट्रक उलटला

शिरपूर (जि.धुळे) : ब्रेक नादुरुस्त झाल्याने नियंत्रण सुटलेला ट्रक (Truck) टोलनाक्यावरील केबिनला धडकून उलटला. ( truck lost control due to failure of brakes overturned after hitting cabin at toll booth dhule news gbp00)

हा अपघात शुक्रवारी (ता. १७) दुपारी साडेपाचला मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ घडला.सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ट्रक व केबिनचे मोठे नुकसान झाले.

मध्य प्रदेशातील पीथमपूर येथून सरगम ब्रॅन्ड साबणाच्या पेट्या घेऊन ट्रक (एचएच १८, बीजी ५४१४) पुण्याकडे जाण्यासाठी निघाला होता. शिरपूर फाटा ओलांडल्यावर ट्रकचे ब्रेक नादुरुस्त झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. दरम्यान, शिरपूर टोलनाक्यापर्यंत ट्रक येऊन पोचला होता.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

चालक सुनील गोरे याने संभाव्य गंभीर अपघात टाळण्यासाठी टोलनाक्याच्या टोल पॅसेजमधून तो रस्त्याच्या बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. त्यात ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने तो दोन केबिन्सला धडक देऊन उलटला.

एव्हाना ट्रकची अवस्था लक्षात आल्याने सर्वच जण अपघात स्थळापासून दूर गेले होते. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही. चालक व सहचालक दोघेही सुरक्षित आहेत. मात्र टोलनाक्यासह ट्रकच्या केबिनची मोडतोड झाली. अपघातानंतर ट्रक बाजूला करण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.