त्र्यंबकेश्वर देवस्थानचे पाणी दररोज वाया

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 जून 2018

नाशिक : त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या पाण्याच्या टाक्या पाणी टंचाईच्या काळात वाहून जात आहे. यामध्ये विश्वस्थांसह कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष कारणीभूत आहे. येथे सध्या शहराला दिवसाआड पाणी पुरविले जात असताना देवस्थानचे पाणी वाया जाण्याचे नेहमीचे दुर्लक्ष चर्चेचा विषय ठरत आहे.

येथील विश्वस्तांची मुदत संपली असून नविन नियुक्त्या होण्यासाठी राजकीय नेते, पदाधिकारी यांनी सर्व प्रकारची फिल्डींग लावल्याची चर्चा होत आहे. कारण हे पद मानाचे आहे. या पूर्वीच्या विश्वस्तांचा मनमानी कारभार, पैसे घेउन भाविकांना दर्शन, कारभारात पारदर्शकता नसणे इ. गोष्टी वादातीत राहिल्या.

यातील पूर्वीच्या विश्वस्थांना पुन्हा घेउ नये असे अर्ज फाटे करण्यात आले असुन येते सतत अधिकारावरुन वाद सुरु असतात. आंतरराष्ट्रीय प्रसिध्द देवालयाचा कारभाराचे वाभाडे मात्र कायम निघत असतात.

सध्या पाण्याच्या टाकीतील हजारो लिटर पाणी भिंतीतुन टंचाई काळात गटारीत जाते परंतु पिण्यास नाही हेउदाहरणच कारभाराची झलक दर्शवते.

Web Title: tryambakehswar temple leakage of water

टॅग्स