न्यायालयात मंगळवार ठरला ‘नो जामीन डे’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

जिल्हा न्यायालयात खून, अपहार, अत्याचार, अमली पदार्थविरुद्ध कायदा आणि मृत्यूस कारणीभूत अशा विविध पाच गंभीर गुन्ह्यांतील संशयितांतर्फे न्यायालयात दाखल जामीन अर्जांवर कामकाज झाले. न्यायालयाने दोन अटकपूर्वसहित सर्व पाचही गुन्ह्यांतील संशयितांचे जामीन फेटाळून लावले. सरकारपक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. न्यायालय होते न्या. एस. जी. ठुबे यांचे...

जळगाव - जिल्हा न्यायालयात खून, अपहार, अत्याचार, अमली पदार्थविरुद्ध कायदा आणि मृत्यूस कारणीभूत अशा विविध पाच गंभीर गुन्ह्यांतील संशयितांतर्फे न्यायालयात दाखल जामीन अर्जांवर कामकाज झाले. न्यायालयाने दोन अटकपूर्वसहित सर्व पाचही गुन्ह्यांतील संशयितांचे जामीन फेटाळून लावले. सरकारपक्षातर्फे ॲड. रमाकांत सोनवणे यांनी कामकाज पाहिले. न्यायालय होते न्या. एस. जी. ठुबे यांचे...

जिल्हा सत्र न्यायालयात आजचा दिवस ‘नो जामीन डे’ ठरला. विविध स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये त्या-त्या गुन्ह्यातील संशयितांनी नियमित व अटकपूर्वसाठी जामीन अर्ज दाखल केले होते. त्या प्रत्येक खटल्यात न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील बाजू ऐकत जामीन नाकारले. 

फुले महामंडळ अपहार प्रकरण 
महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ अपहार प्रकरणात स्टेट बॅंकेचे मुख्य प्रबंधक अशोक विनायकराव सोनूने यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दाखल गुन्ह्यात स्टेटबॅंक कर्मचारी जयेश रघुनाथ सोनार (सहाय्यक), प्रकाश कुळकर्णी (कंत्राटी नियुक्त) यांच्यासह अमरिश मोकाशी, संजीव सोनवणे, सागर पत्की अशा एकूण पाच संशयितांच्या विरुद्ध बोगस लाभार्थी उभे करून त्यांच्या नावे तीन लाख रुपयांचे कर्ज प्रकरणे मंजूर करून घेत ते पैसे बेकायदेशीर स्वत:च्या उपयोगासाठी काढून घेतल्याचे आढळून आले. सोनूने यांनी १० जुलैला दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रकाश कुळकर्णी याच्यावतीने दाखल अटकपूर्व जामीन न्या. ठुबे यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. 

बी. जे. मार्केट खून प्रकरण
शहरातील बी. जे. मार्केट येथे वासुदेव डांगे या साठ वर्षीय इलेक्‍ट्रिशयनला मारहाण करून ठार मारण्यात आल्याची घटना चार जूनला सायंकाळी घडली होती. जिल्हापेठ पोलिस ठाण्यात ईश्‍वर भिका माळी, नीलेश भालचंद्र बाविस्कर, लक्ष्मण ऊर्फ राज रामभाऊ न्हावी, सतीश अण्णा भोपळे अशा चौघा संशयिताच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यातील संशयित व मारहाणीस कारणीभूत लक्ष्मण ऊर्फ राज न्हावी याच्यावतीने दाखल जामीन अर्जावर कामकाज होऊन न्या. ठुबे यांच्या न्यायालयाने संशयिताचा जामीन फेटाळून लावला आहे.

अल्पवयीन अत्याचार प्रकरण 
जामनेर तालुक्‍यातील सोळावर्षीय अल्पवयीन बालिकेवर १५ जूनला झालेल्या अत्याचार प्रकरणात बाललैंगिक अत्याचारप्रकरणी चार संशयितांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. दाखल गुन्ह्यातील संशयित अर्जुन रामदास नवघरे याच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्जावर न्या. ठुबे यांच्या न्यायालयात कामकाज होऊन न्यायालयाने संशयिताचा जामीन फेटाळून लावण्याचे आदेश दिले आहेत.

सत्तर लाखांचे गांजा प्रकरण
चाळीसगाव भडगाव रोडवर स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने पाळत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tuesday No Bell day in court