सोशल मीडियावर मुंढेंना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

नाशिक - महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल करून राजकीय पक्षांनी दंड थोपटले असताना, विविध संघटनांकडूनही प्रस्तावाला समर्थन मिळत आहे. दुसरीकडे, आयुक्तांच्या बाजूनेही समर्थनार्थ शहरातील एक गट उतरला असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वुई सपोर्ट मुंढे’ या हॅशटॅगवर मोहीम राबविली जात आहे. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर सामाजिक संस्थांतर्फे बैठक घेण्यात आली. त्यात त्यांच्या समर्थनार्थ शहरात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महापालिका आयुक्त मुंढे यांनी नाशिककरांवर लादलेली करवाढ व नगरसेवकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल करण्यात आला. १सप्टेंबरला विशेष महासभाहील बोलावली आहे. आयुक्तांच्या समर्थनार्थ व्हॉट्‌सॲप, फेसबुकच्या माध्यमातून विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवत आयुक्तांवरील अविश्‍वास प्रस्ताव मागे घेण्याची मागणी करताना राजकारण्यांना जाबही विचारण्यात आला. आयुक्त कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावली असून, भ्रष्टाचार बंद झाल्यानेच त्यांच्याविरोधात अविश्‍वास प्रस्ताव दाखल केल्याचा आरोप दिवसभर सोशल मीडियावरून व्हायरल होत होता. टीकेचा रोख सत्ताधारी भाजपवर होता. पारदर्शक कारभाराला लोकप्रतिनिधी घाबरतात का?, असा सवाल करण्यात आला. सचिन मालेगावकर, जितेंद्र भावे, जसबीर सिंह, समाधान भारतीय यांच्या उपस्थितीत समर्थनार्थ शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. ‘मी नाशिककर’ बॅनरखाली एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

आयुक्तांसाठी ‘वॉक फॉर कमिशनर’
‘वॉक विथ कमिशनर’ उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या आयुक्त मुंढे यांच्या समर्थनार्थ ३१ ऑगस्टला सकाळी दहाला गोल्फ क्‍लब येथून महापालिका मुख्यालयापर्यंत ‘वॉक फॉर कमिशनर’ मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Tukaram Munde Support by Social Media