तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात बदली

Tukaram-Munde
Tukaram-Munde

नाशिक - नऊ महिन्यांपासून चर्चेत राहिलेले प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची अखेर आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. त्यांना मंत्रालयात नियोजन विभागाचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आली.  गुरुवारी पालिका मुख्यालयात मुंढे यांनी कामकाजाला सुरुवात केली आणि त्यानंतर आज अर्धा तासाने शासन आदेश त्यांच्या हातात पडले अन्‌ त्याचक्षणी मुंढे यांनी पालिका मुख्यालयातून काढता पाय घेतला. मुंढे समर्थकांसाठी ही बाब हळहळ व्यक्त करणारी ठरली. तर, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुखद धक्का असल्याने त्यांनी पालिका आवाराबाहेर फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर ऑगस्ट महिन्यात सत्ताधारी भाजपकडून अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर प्रस्ताव मागे घेतल्यानंतर भाजपमधील पदाधिकारी संताप व्यक्त करीत होते. मुंढे यांची बदली ऑक्‍टोबर महिन्यातच निश्‍चित होती. पण त्यावर शिक्कामोर्तब नव्हते. मंगळवारी सोशल मीडीयावर बदलीचा संदेश व्हायरल झाला. त्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दुजोरा दिल्यानंतर बदलीच्या चर्चेला उधाण आले. कार्यालय सुरू झाल्यानंतरदेखील शासन आदेश न पोहोचल्याने बदलीची अफवाच ठरताना दिसत होते. मात्र, साडेअकराच्या सुमारास अपर मुख्य सचिव (सेवा) सीताराम कुंटे यांच्या आदेशाचे पत्र पालिका मुख्यालयात धडकले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com