'सडेतोड' अधिकारी तुकाराम मुंढेंची नाशिकहूनही बदली 

Tukaram Mundhe transferred from Nashik within just nine months
Tukaram Mundhe transferred from Nashik within just nine months

नाशिक : स्वभाव आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने उडणारे खटके यामुळे नाशिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची आज अखेर पुन्हा मुदतपूर्व बदली झाली. आता नाशिकच्या आयुक्तपदावरून आता मुंढे यांना थेट मंत्रालयातील नियोजन विभागात सहसचिवपदी पाठविण्यात आले आहे. 

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. पुण्यातील 'पीएमपीएमएल'मधून मुंढे यांना नाशिकमध्ये महापालिकेत पाठविण्यात आले होते. आता केवळ नऊ महिने 12 दिवसांमध्येच मुंढे यांची पुन्हा बदली झाली. मुंढे यांच्या बदलीचे आदेश हाती पडल्यानंतर ते तातडीने महापालिकेतील कार्यालयातून बाहेर पडले. दुसरीकडे, या आदेशानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापौरांच्या निवासस्थानाबाहेर फटाके फोडले. 

प्रशासकीय शिस्तीत सरसकट नगरसेवकांना एका तराजूमध्ये तोलण्याचा प्रयत्न मुंढे यांच्या विविध निर्णयांतून झाल्याने लोकप्रतिनिधींशी सातत्याने संघर्षाच्या ठिणग्या पडत राहिल्या. ऑगस्टमध्ये स्थायी समितीच्या 14 सदस्यांनी मुंढे यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावेळी नाशिककरांनी महापालिकेच्या आवारात जाऊन मुंढे यांची भेट घेऊन त्यांना समर्थन दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे सत्ताधारी भाजपला त्यावेळी नमते घ्यावे लागले होते. त्यानंतरही मुंढे यांच्याविरोधातील लोकप्रतिनिधींचा संघर्ष टोकदार राहिला. 

मुंढे विरुद्ध लोकप्रतिनिधी संघर्षाची कारणे 

  • अंतर्गत रस्त्यांच्या 257 कोटींच्या कामांवर फुली 
  • महासभा मग स्थायी समिती अन पुन्हा महासभा या प्रचलित पद्धतीऐवजी स्थायीची अंतिम मंजुरी केली रूढ 
  • अंदाजपत्रक थेट स्थायी समितीला सादर 
  • आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिल्यावर ठराव 15 दिवसांत प्राप्त न झाल्यास अंमलबजावणीचे स्वीकारलेले धोरण 
  • एका प्रभागात दोन कोटींच्या निधीला कायदेशीर आधार नसल्याचे कारण देत नगरसेवकांना दोन लाख रुपयांचाच निधी देण्याचा लावून धरलेला मुद्दा 
  • 259 चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील सर्व करयोग्य मूल्यदरवाढीच्या फेऱ्यात आणले. त्याविरुद्ध नाशिककर रस्त्यावर उतरले. 

कर्मचारी-अधिकाऱ्यांचीही नाराजी 

  • पटसंख्येच्या आधारे शाळा बंद करत समयोजनेचा फॉर्म्युला वापरल्याने महापालिका शाळांची संख्या 128 वरून पोचली 90 पर्यंत 
  • कमी मुलांमुळे 128 अंगणवाड्या बंद; त्यामुळे सेविका आणि मदतनिसांच्या आंदोलनाने जोर धरला 
  • सफाई कर्मचारी रडारवर घेत असताना आऊटसोर्सिंगच्या पद्धतीने सफाई कर्मचाऱ्यांची नाराजी वाढली 
  • बडतर्फी, निलंबन, चौकशी पूर्ण करत कारवाई करण्याचा सुरू ठेवला सपाटा 
  • 44 टक्के पाणीगळतीवर शिक्कामोर्तब आणि उद्यानांचे खासगीकरण 
  • उपअभियंता रवींद्र पाटील यांचे घर सोडून जाणे आणि सहाय्यक अधीक्षक रवींद्र धारणकर यांच्या आत्महत्येने प्रशासनाच्या कारभारावर उपस्थित केले प्रश्‍नचिन्ह 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com