तूर हमीभाव केंद्र बंद केल्याने शेतकऱ्यांची तूर खरेदीपासून वंचित

हुकूम मुलाणी  
बुधवार, 18 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या तुर हमी भाव केंद्रातील खरेदी अक्षयतृतीयेपासून बंद केल्यामुळे तालुक्यातील 895 शेतकऱ्यांची जवळपास 5 हजार क्लिटंल तुर खरेदीवाचून राहिल्यामुळे सध्याच्या वादळी वातावरणात तुर उत्पादक शेतकय्रांचे डोळे आकाशाकडे लागले शासनाच्या या धोरणाबददल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

मंगळवेढा (सोलापूर) : शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या तुर हमी भाव केंद्रातील खरेदी अक्षयतृतीयेपासून बंद केल्यामुळे तालुक्यातील 895 शेतकऱ्यांची जवळपास 5 हजार क्लिटंल तुर खरेदीवाचून राहिल्यामुळे सध्याच्या वादळी वातावरणात तुर उत्पादक शेतकय्रांचे डोळे आकाशाकडे लागले शासनाच्या या धोरणाबददल शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

शेतकऱ्यांला शेतीतून मिळणाऱ्या मालाला हमी भाव मिळावा व व्यापाऱ्याकडून होणारी लूट थांबावी या उद्देशाने शासनाने फेडरेशनच्या माध्यमातून तुर उत्पादक शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्यासाठी तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे हमी भाव केंद्रे सुरु केल्यामुळे त्यामुळे तालुक्यातील तुर विक्री करणाय्रा शेतकऱ्याला या फायदा झाला

मंगळवेढा येथील हमी केंद्रावरील व्यवस्थेमुळे तालुक्याबरोबर सांगोला, पंढरपूर, मोहोळ व अन्य ठिकाणचे शेतकरी मालाची विक्री करण्यास येऊ लागले आलेल्या शेतकऱ्याला एक रुपयात नाष्टा देऊन त्यांचीही उपासमार थांबवली. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीची खरेदी करताना तालुक्यातून 1506 शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामधील 1056 शेतकऱ्याला तुर विक्रीसाठी आणण्याचे मेसेज मोबाईलवर पाठवले. त्यामधील 611 शेतकऱ्याकडून खरेदी करुन त्यांच्या रकमा थेट 264 शेतकय्रांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी 1 कोटी 65 लाखाची रक्कम प्राप्त झाले.

आणखी नोंदणी 895 शेतकरी वंचीत असून त्यांना ही खरेदी बंद केल्यामुळे जवळपास पाच क्लिंटल तुर खरेदीवाचुन पडून सध्या अवकाळी पावसाच्या वातावरणामुळे कमी दराने खासगी व्यापाऱ्याला विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. पण हमी भाव केंद्र बंद केल्यामुळे तालुक्याबरोबर शेजारच्या तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला.

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांमधून आणखी शेतकऱ्यांकडील तुर खरेदी करावयाची असल्याचे शासनास पत्रान्वये कळविले असून खरेदी करण्यास मान्यता देण्याची मागणीही केली असून मान्यता दिल्यास तालुक्यातील एकही शेतकरी वंचीत राहणार नाही याची काळजी घेणार, असे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिध्देश्‍वर आवताडे यांनी सांगितले.

कमी भाव केंद्र सुरु झाल्यामुळे तुरीला चांगला दर मिळत असल्याने नोंदणी केली पण अचानक खरेदी बंद केल्यामुळे सध्या ढगाळ वातावरणामुळे तुरीचे काय करायची असा प्रश्‍न निर्माण झाला, असे कुंडलिक मोरे यांनी सांगितले. 

Web Title: tur center getting closed no sale