पुरग्रस्तांसाठी वीस लाखांचा किरणामाल; येवलेकरांच्या दात्तृत्वाला सलाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

येवला येथील युवकांच्या पुढाकाराने शहरातील विविध दानशूरांकडून तब्बल २० लाखांचा किराणामाल पुरग्रस्तांसाठी संकलित करण्यात आला असून, आज या साहित्याचा ट्रक येथून रवाना झाला. 

येवला : येथील युवकांच्या पुढाकाराने शहरातील विविध दानशूरांकडून तब्बल २० लाखांचा किराणामाल पुरग्रस्तांसाठी संकलित करण्यात आला असून, आज या साहित्याचा ट्रक येथून रवाना झाला. 

सातारा,सांगली,कोल्हापूर,जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. त्यात या जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर येऊन अनेक सर्वसामान्य कुंटुबे उध्वस्त झाली.अजूनही याच्या झळा येथील नागरिक सहन करत आहेत. येथील भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे व त्यांच्या मित्र परिवाराने येवलेकरांकडून पुरग्रस्तांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे असा विचार मांडून नागरिकांना आवाहन करण्यात आले.

या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील व शहरातील अनेक दानशूर व्यक्तींनी मोलाची मदत केली, ही मदत कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अनेक गावात पोहच करण्यात येत आहे. या कामासाठी शिरोळ भाजपाचे तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे,जन जागर प्रतिष्ठानचे देवराज देशमुख,संजय हांगे मदत करत आहे.रविवारी रवाना झालेले कार्यकर्ते रात्री दहा वाजेपर्यंत घरोघरी फिरून गरजूंना हे साहित्य वाटत होते.

फक्त शाब्दिक आवाहनाला दाद देत भाजपा नेते बाबा डमाळे, ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, शिवसेना नेते संभाजी पवार, दत्ता निकम, सोनी पैठणीचे निशांत सोनी, नगरसेवक गणेश शिंदे, सुनील शिंदे, मातोश्री शांताबाई सोनवणे हायस्कुल अंदरसुल, गोल्हेवाडी ग्रामस्थ, गंगादरवाजा मित्र मंडळ, जय बजरंग फ्रेंड सर्कल, अमित टोनपे, दुर्गा वहिनी, नेमिनाथ जैन हायस्कूल चांदवड, सुरेश डुकरे, श्रीराम सेना, स्वप्नील करंजकर, लक्कडकोट शाळा, विनोद कासलीवाल, रुपम भांबारे, रामुशेठ हबडे, क्षत्रिय मोबाईल, अड. वसईकर, सागर रायजादे, विठ्ठलमामा परदेशी, मारुती पवार, चालक-मालक संघटना, व्यंकटराव हिरे पतसंस्था, किशोर माळी, श्रमिक सेना येवला, शशिकांत देशमुख, साईनाथ बिडवे, ज्ञानेश्वर सेवा समिती, सुनील गुजराथी, कलामंदिर पैठणी, हस्तकला पैठणी, मुन्नाशेठ माडीवाले, देविदास भांबारे, मानस कलेक्शन, योगेश खैरनार, बंटी धसे, बुंदेलपुरा तालीम संघ, कर्पे साहेब, पी. के. काळे, पोपट नागपुरे, आरिफ सौदागर, शैलेश देसाई, जगदाळे, गुरुनानक स्टोअर्स, सुनील ठोबरे, योगेश शेळके, अंबिका हॉटेल, राजेश भंडारी, मयुर हबडे, मुंदडा शेठ, मोतीवाले ज्वेलर्स आदि नागरिकांच्या सहकार्यातून २० लाखाच्या आसपास किरणामाल व इतर संसार उपयोगी वस्तूंचे संकलन करण्यात आले.

यातून ५ हजार पिशव्यांचे पॉकेट बनविण्यात आले या कामासाठी दहा ते बारा दिवसापासून भाजपाचे शहराचे कार्यकर्ते श्रमदान करत होते. प्रामुख्याने शहराध्यक्ष आनंद शिंदे, श्रावण जावळे, दिनेश परदेशी, सचिन खरात, युवराज पाटोळे, मयुर मेघराज, सचिन धकाते, संतोष नागपुरे, संतोष काटे, मयुर कायस्थ, भूषण भावसार, बंटी धसे, सागर नाईकवाडे, कृष्णा राठोड, मुन्ना तांबोळी, अमोल क्षिरसागर, प्रमोद घाटकर, प्रल्हाद कवाडे, सचिन धारक, हेमंत पवार, सिद्धेश घाटकर, योगेश व्यवहारे, जगदीश भावसार, सागर घाटकर, शुभम घाटकर आदींनी सक्रीय पुढाकार घेतला आहे. तसेच पूरग्रस्त गावांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी भाजपा वैद्यकीय आघाडीचे शहरप्रमुख डॉ. महेश्वर तगारे व सहकार्यांनी योगदान दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty lakhs Groceries for flood victims