शोरूमच्या बॅंक खात्यातून वीस लाख परस्पर काढले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

नाशिक - दुचाकीचे आगाऊ बुकिंग रद्द केल्यानंतर शोरूमचालकाने दिलेल्या धनादेशात फेरफार करून दोन संशयितांनी शोरूमच्या बॅंक खात्यातून तब्बल 20 लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फिर्याद दाखल केली.

शांतिचंद्र पांडे (वय 63, रा. दिंडोरी म्हसरूळ रोड) यांच्या फिर्यादीनुसार, सप्टेंबर 2016 दरम्यान एका जोडप्याने पती-पत्नी असल्याचे भासविले. पत्नी गंगापूर रोडवरील थत्तेनगर येथील एका बॅंकेची शाखा अधिकारी असल्याची ओळख जोडप्याने गंजमाळ येथील जितेंद्र ऑटोमोबाईल शोरूममध्ये दिली. त्यानंतर त्यांनी शोरूममधून दुचाकी बुक करण्यासाठी दोन हजार रुपये दिले. मात्र दोघांनी दुचाकीचे बुकिंग रद्द करत असल्याचे सांगत शोरूमचालकांकडून दोन हजार रुपये मागितले. त्यामुळे शोरूमचालकांनी दोघांना रोख स्वरूपात पैसे न देता धनादेश दिला. मात्र या धनादेशावर दोन संशयितांनी फेरफार करून दोन हजार रुपयांऐवजी 20 लाख रुपयांची रक्कम टाकली. त्यानंतर धनादेश एचडीएफसी बॅंकेत वटवून 20 लाख रुपये संशयितांनी स्वत:च्या खात्यात वर्ग केले.

Web Title: twenty million corresponds to the showroom