Latest Marathi News | जिल्ह्यातील 26 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 drunk drivers

Nandurbar News : जिल्ह्यातील 26 मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

नंदुरबार : थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस विभागातर्फे दारू पिऊन वाहन न चालविण्याचे आवाहन करण्यात आले होते. तरीही अनेकांनी आवाहनाकडे दुर्लक्ष करीत मद्यपान करून दुचाकी व चारचाकी चालविण्याचा हेका केला.

त्यामुळे पोलिसांनी अशा मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगरला आहे. ३० डिसेंबरला दिवसभरात विविध पोलिस ठाण्यांतर्गत जिल्ह्यातील २६ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

नागरिकांना नववर्षाचे स्वागत आनंदाने करता यावे त्यासाठी हॉटेल-बार यांना वेळेतही सूट देण्यात आली होती. मात्र दारू पिऊन वाहने चालविण्याचा धोका मोठा असतो, अनेकांचा अपघातात जीव जातो. (Twenty Six alcoholics in district Action against motorists Nandurbar news)

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Nandurbar News : दोन दिवसांत 141 तळीरामांवर गुन्हे दाखल

त्यामुळे अपघात व त्यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना थर्टीफर्स्टच्या आनंदात अघटित घटना घडू नये, म्हणून दारू पिऊन वाहने न चालविण्याचे आवाहन केले होते.

त्यासोबतच मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचाही इशारा दिला होता. त्यामुळे थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यात ३० डिसेंबरला २६ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ती अशी ः तळोदा २, नवापूर ७, विसरवाडी १, म्हसावद २, अक्कलकुवा ५, धडगाव ३, मोलगी २, नंदुरबार तालुका ४, एकूण ः २६.

हेही वाचा: Nashik News : आदिशक्तीच्या दर्शनाला भाविकांची मांदियाळी....