वीस हजार कोटींच्या नोटा होणार खाक

विनोद बेदरकर - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

नाशिक - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा फटका नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयाला बसणार असून, छापून तयार असलेल्या एक हजाराचे दर्शनी मूल्ये असलेल्या  २० हजार कोटींच्या (२०० दशलक्ष नोटा) चलनात येण्यापूर्वीच खाक होणार आहेत. चलार्थपत्र मुद्रणालयाच्या दृष्टीने हे तोट्याचे पाउल ठरणार आहे.

चलनात दोन हजार व पाचशे रुपयांच्या नव्या नोटांचे पुढील आठवड्यात पर्दापण होणार आहे. काळ्या पैशाला लगाम लावण्याच्या दिशेने अतिशय निर्णायक स्वरूपाचे पाऊल म्हणून या चलन बदलांकडे पाहिले जाते; पण या निर्णयासाठी मोजली गेलेली किंमतही कमी नाही. एकट्या चलार्थपत्र मुद्रणालयात नव्या कोऱ्या छापून तयार चलनात येण्याच्या प्रतीक्षेतील सुमारे २०० दशलक्ष नोटा खाक कराव्या लागणार आहेत. कारण काल (ता. ८) मध्यरात्रीपासून या नोटा कायदेशीररीत्या बाद केले गेल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या हजार रुपयांच्या करकरीत नोटांची राख होणार आहे.

‘सकाळ’कडून पर्दाफाश

नाशिक रोडच्या चलार्थपत्र मुद्रणालयात एक हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईचे काम वर्षापासून सुरू आहे. ‘मेक इन इंडिया’अंतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरातून होत असलेल्या नोटा छपाईसाठी होशंगाबाद येथील स्वदेशी कागद वापरला गेला; पण वापरल्या गेलेल्या कागदात आवश्‍यक असलेल्या सुरक्षा तारा (सिक्‍युरिटी थ्रेड) नसल्याचे प्रकरण ‘सकाळ’ने उजेडात आणले होते. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने त्याची दखल घेत सुरक्षेचे आदेश दिले. तीन महाव्यवस्थांकाची समिती नेमली गेली. त्यानंतर सदोष नोटांच्या चौकशीसाठी स्वतंत्र कामकाज सुरू झाले. चौकशीनंतर सदोष नोटा शोधण्यासाठी स्वतंत्र ठेका दिला गेला. कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामात सुरक्षा तारा नसलेल्या नोटांचा शोध घेऊन निर्दोष नोटा शोधल्या जात आहेत; पण आता एक हजाराच्या नोटाच अवैध ठरल्याने, कोट्यवधींच्या नोटा खाक होणार आहेत.

Web Title: Twenty thousand million notes will be consumed