एका तासात कोसळले २२ वृक्ष..अग्निशमनला तब्बल २८ कॉल 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

रविवार दुपारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. एका तासात तब्बल ४० मिलिमीटर पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाणी साचणे, वृक्ष कोसळणे, पाण्याच्या प्रवाहात नागरिक अडकणे असे प्रकार घडल्याने अग्निशमन विभागाचा दूरध्वनी सतत खणखणत होता. तासाभरात त्याना तब्बल २८ कॉल झाले. त्यात शहराच्या विविध भागांत रस्त्यावर, वाहनांवर वृक्ष कोसळण्याच्या २२ घटना घडल्या. त्याचप्रमाणे सहा ठिकाणी पाणी साचल्याने मदतीसाठी कॉल आले

नाशिक : शहरात रविवारी (ता. ६) जोरदार पाऊस झाला. एका तासाच्या पावसाने संपूर्ण शहरास झोडपून काढले. अग्निशमन विभागाला यादरम्यान विविध प्रकारचे २८ कॉल आले. त्यात सर्वाधिक वृक्ष कोसळण्याच्या घटनांचे कॉल होते. विविध भागांत सुमारे २२ वृक्ष कोसळल्याची माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. 

रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप 
रविवार दुपारी झालेल्या जोरदार पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. एका तासात तब्बल ४० मिलिमीटर पाऊस पडल्याने रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी पाणी साचणे, वृक्ष कोसळणे, पाण्याच्या प्रवाहात नागरिक अडकणे असे प्रकार घडल्याने अग्निशमन विभागाचा दूरध्वनी सतत खणखणत होता. तासाभरात त्याना तब्बल २८ कॉल झाले. त्यात शहराच्या विविध भागांत रस्त्यावर, वाहनांवर वृक्ष कोसळण्याच्या २२ घटना घडल्या. त्याचप्रमाणे सहा ठिकाणी पाणी साचल्याने मदतीसाठी कॉल आले. दरम्यान, गोदावरीची पातळी वाढल्याने म्हसोबा पटांगणात पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या तीन युवकांची अग्निशमन विभागाकडून सुखरूप सुटका करण्यात आली. 

असे झाले कॉल 
कार्यालय झाड पडणे, पाणी साचणे 
अग्निशमन मुख्यालय ६१ 
नवीन नाशिक ५५ 
पंचवटी ३ 
सातपूर ६ 
पंचवटी विभाग (के.के.वाघ केंद्र) २


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty two tree fell in an hour, exactly 28 calls to the fire briged at nashik