नवापूर येथे अडीच कोटींचा दरोडा

Two and Half Crore Robbery in Navapur
Two and Half Crore Robbery in Navapur

नवापूर : नवापूरला भरदुपारी अडीच कोटींचा दरोडा टाकल्याची घटना घडली. अहमदाबादच्या कंपनीत रोकड नेत असताना सहा जणांनी शस्त्राचा धाक दाखवून लुटले. ही घटना दुपारची मात्र फिर्याद देण्यासाठी सायंकाळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

दरोड्याची माहिती मिळताच रात्री बारा वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील आपल्या अधिकाऱयांचा ताफा घेऊन घटनास्थळी रात्री बारा वाजता उपस्थित झाले. पोलिस अधीक्षकांनी घटनेचा तपासासाठी अधिकाऱ्यांना गुजरातकडे रवाना केले. रात्री दोन वाजेपर्यंत कर्मचारी तपास करत  होते.

नवापूरकडून पिंपळनेरकडे जाणाऱ्या  रस्त्यावर रायपूर जाम तलावदरम्यान गुरूवारी सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास रिव्हॉल्वर व चाकूचा धाक दाखवून दोन कोटी 41 लाख 50 हजारांची लूट करण्यात आली आहे. भरदिवसा पडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. व्यापारी जळगावहून अहमदाबादला एका कंपनीचे पैसे घेऊन जात असताना नवापूर पिंपळनेर रस्त्यावर ही लूट करण्यात आली. या दरोड्याचा गुन्हा नवापूर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. सहा अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत याबाबतचा तपास करीत आहेत. सदर घटना गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिस अधीक्षक संजय पाटील आपल्या अधिकाऱयांसह रात्री बाराला नवापूर पोलिस ठाण्यात आले. घटनेची माहिती घेतली, तपासासाठी लगेच अधिकाऱयांना गुजरातकडे रवाना केले. 

शैलेषकुमार द्वारकाभाई पटेल (चालक, वय ३८, राहणार, थलोटा, ता, बिशनगर, जिल्हा, म्हैसणा, हल्ली मुक्काम अलथान भटार, सुमन अमृत सोसायटी, शिव बिल्डिंग रूम नंबर १००१ सुरत) 
यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हरिषभाई पटेल व मेहुलभाई पटेल यांच्यासोबत 11 नोव्हेंबरला जळगावहून टाटा सफारी स्ट्रॉंग या चारचाकी वाहनाने अहमदाबादकडे जाताना नवापूर पिंपळनेर रस्त्यावर नवापूरपासून पाच किलोमीटरवर इनोव्हा या चारचाकी वाहनात आलेले सहा अज्ञातांनी टाटा सफारी स्ट्रॉंग वाहन अडवून चाकूचा धाक दाखवून दोन कोटी 41 लाख 50 हजार रुपये लुटून नेले. 

घटना दुपारी घडल्यावर शैलेषभाई पटेल व त्यांच्या सहकऱ्यांनी मालकांशी बोलून विचारविनिमय करून सायंकाळी उशिरा नवापूर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 
पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपूत करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com