अश्‍लील छायाचित्र पाठवून खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

नाशिक - युवतीच्या छायाचित्रावरून बनावट अश्‍लील छायाचित्र तयार करून ते तिला पाठविले. तसेच, ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पाच लाखांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या दोघांना उपनगर पोलिसांनी सायबर गुन्हे शाखेच्या मदतीने शिताफीने अटक केली. यात एक नाशिकचा, तर दुसरा संशयित नवी मुंबईतील आहे. जयंत प्रभाकर झांबरे (42, रा. फ्लॅट 102, जयप्राइड अपार्टमेंट, इंदिरानगर) व राकेश गोरख पवार (30, रा. हिराजी सदन, रूम नं. 301, एरोली, नवी मुंबई) अशी संशयितांची नावे आहेत. 

वरील दोघा संशयितांनी पीडित युवतीचा छायाचित्रावरील चेहरा कट करून त्यावरून अश्‍लील छायाचित्र व व्हिडिओ तयार करून ते तिच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविले. ते छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या नातलगांनाही पाठविण्याची धमकी देऊन 5 लाखांची खंडणी मागितली होती. याबाबत उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार सायबर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी तांत्रिक माहिती पथकाला दिली. त्यावरून उपनगरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत, गुन्हे शाखेचे देवराज बोरसे, उपनिरीक्षक गिते, परदेशी, गवांदे, अरिफ शेख, महाजन, बाविस्कर व पोलिसमित्र श्रीराम निकम यांनी संशयित जयंत झांबरे यास नाशिकमधून, तर राकेश पवार यास नवी मुंबईतून शिताफीने अटक केली. त्या दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली. 

Web Title: Two arrested for extortion seeking