मालेगावच्या दोघांना बैलांची वाहतूक करताना अटक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

जामनेर तालुक्‍यातील नेरी येथून आठ गावरान जातीचे बैल मालेगाव येथे नेत असल्याची माहिती दोघांनी दिल्यावर दोघांना ट्रक सह ताब्यात घेण्यात येऊन बैलांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. ट्रकचालक व क्‍लीनर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव,:- जामनेर तालुक्‍यातील नेरी येथून आठ गावरान जातीचे बैल मालेगाव नेत असलेल्या ट्रक चालकाला वावडदा वासीयांनी पकडले. एमआयडीसी पोलिसांनी धाव घेत बैलांना गोशाळेत रवाना केले असून ट्रक चालकासह क्‍लिनरला अटक करण्यात आली आहे. 

वावडदा (ता.जळगाव) येथे ग्रामस्थांनी गुरांची वाहतूक करणारा ट्रक अडवून धरल्याची माहिती मिळताच निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, शिवदास चौधरी अशांच्या पथकाने धाव घेत घटनास्थळ गाठले. वावडदा गावा जवळ ट्रक क्र. (एमएच.18 एम.8888) देविदास इंदलकर, पोलिस पाटील मुकुंद पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी अडवून धरला होता. पोलिसांनी ट्रकचालकाची चौकशी केल्यावर, चालक इद्रिसखान याकूब खान (वय-28,रा.रजा चौक मालेगाव), रिझवान खान इब्राहिम खान (वय-25, नागछाप झोपडपट्टी मालेगाव) असे दोघांनी नावे सांगितली. जामनेर तालुक्‍यातील नेरी येथून आठ गावरान जातीचे बैल मालेगाव येथे नेत असल्याची माहिती दोघांनी दिल्यावर दोघांना ट्रक सह ताब्यात घेण्यात येऊन बैलांची गोशाळेत रवानगी करण्यात आली आहे. ट्रकचालक व क्‍लीनर यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested from Malegaon while transporting bullocks