मेहुणबारेच्या तरूणाचा अज्ञात वाहनांच्या धडकेत मृत्यू

दीपक कच्छवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

ग्रामपंचायत कर्मचारीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रात्री दोनच्या पुन्शी पेट्रोल पंपाजवळ घडली.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - चाळीसगाव येथुन रात्री हळदीचा कार्यक्रम आटोपुन पायपीट घराकडे येत असलेल्या मेहुणबारे येथील ग्रामपंचायत कर्मचारीस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रात्री दोनच्या पुन्शी पेट्रोल पंपाजवळ घडली.

मेहुणबारे येथील ग्राम पंचायतचे सफाई कामगार (घंटा गाडी चालक) दिलीप वडार (वय 30) चाळीसगाव येथुन हळदीचा कार्यक्रम आटोपून घराकडे येण्यासाठी वाहन मिळत नसल्याने ते पायपीट करीत रस्त्याने चालत होते. रात्री 2 वाजता पुन्शी पेट्रोल पंपाजवळच अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात झाला. अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यु झाला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Two Dead Accident in Mehunbare