भवानीची ज्योत आणणारे दोघे अपघातात ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

नांदुरशिंगोटे - तुळजापूर येथून भवानीमातेचे दर्शन घेऊन ज्योत घेऊन येणाऱ्या भाविकांच्या ट्रकला झालेल्या अपघातात दोन भाविक जागीच ठार, तर दहा जण जखमी झाले. ही घटना काल मध्यरात्री निमोण नाक्‍याजवळील वळणरस्त्यावर हॉटेल प्रियालसमोर घडली. मृत भाविकांची नावे अक्षय शिवाजी बोकुड (वय 22, रा. सांजेगाव, ता. इगतपुरी) व बबन गोविंदराव रवंदळे (वय 23, रा. लहानगेवाडी, ता. इगतपुरी) अशी आहेत.

विल्लोळी येथील चाळीस ते पन्नास भाविक तुळजापूर येथून देवदर्शन करून गावी तळेगावमार्गे ट्रक व दोन तरुण ज्योत घेऊन दुचाकीने परतत असताना नांदुरशिंगोटे बायपास हॉटेलसमोर ज्योतीला तेल टाकण्यासाठी थांबले. काल मध्यरात्री कंटेनर हा पाठीमागून भरधाव वेगाने येत त्यांच्या मालट्रकला व तीन मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात अक्षय व बबनचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकमधील दहा जण जखमी झाले.

Web Title: Two Death in Accident