दुचाकींच्या समोरासमोर धडकेत 2 जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

पांढुर्ली : घोटी-सिन्नर महामार्गावरील घोरवड शिवारात भरधाव दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोन जण जागीच ठार, तर एक महिला व आणखी एक व्यक्ती जखमी असल्याचे समजते. हा अपघात सायंकाळी साडेसातच्या सुमारास झाला. दरम्यान, पोलिस घटनास्थळी उशिरा आल्याने अपघाताची नेमकी माहिती मिळू शकली नाही.

सिन्नर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर घोरवड शिवारात दोन मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात जयराम अर्जुन नाठे व सुदाम एकनाथ माळी हे गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

पवन पांडुरंग घोडे (वय 25, रा. सोनांबे) व एक महिला जखमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, उशिरापर्यंत ते मृताच्या नावाची खात्री करत होते.

Web Title: two die in bike accident