एसटी आणि कारची धडकेत दोघे जागीच ठार

मार्तंड बुचुडे
मंगळवार, 26 जून 2018

पारनेर : भाळवणी नजिक माळकूप शिवारात नगर-कल्याण महामार्गावर दुपारी एकच्या सुमारास एसटी बस व कार यांची जोरदार समोरासमोर धडक झाली. यात पंकज शहा व त्यांची पत्नी रूपाली शहा हे दोघे जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र आमन हा गंभीर जखमी झाला.

या बाबत माहीती अशी की, नगर-कल्याण महामार्गावर माळकूप शिवारात आज ( ता. 26) दुपारी एक वाजणेच्या सुमारास नगरहून कल्याणकडे जाणा-या गेवराई-भिंवंडी बसची (एम.एच.20 बी.एल.3066) कल्याणहून नगरकडे येत असलेल्या (एम.एच.16 बी. एच. 7743) या कारला जोराची धडक दिल्याने या अपघातात शहा पती- पत्नी जागीच ठार झाले. व शहा यांचा मित्र आमन (पुर्ण नांव समजू शकले नाही ) हा गंभीर जखमी झाला. त्यास नगर येथे पुढील ऊपचारासाठी पाठविण्यात आले आहे. शहा हे नगरचे एक व्यापारी होते. अपघाताची माहीती समजताच पारनेरचे पोलीस निरीक्ष हनुमंत गाडे, अण्णा चव्हाण आदींनी घटणास्थळी धाव घेतली. तो पर्यंत भाळवणी येथील संतोष पाऱख व काही कार्यकर्त्यांनी अपघात ग्रामस्थांना पुढील ऊपचारासाठी  हलविण्यासाठी मदत केली.
    
Web Title: two die in car and st bus accident