दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसांसह सहा संशयित जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 नोव्हेंबर 2016

मालेगाव - येथील कॅम्प भागातील गजबजलेल्या हेरंब गणेश मंदिरामागील पापा मैदानावरून पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. संशयितांनी मध्य प्रदेशातून हे कट्टे आणल्याची शक्‍यता आहे. कट्ट्याचा वापर करून पंचशीलनगरमध्ये तसेच शहरात अन्य तीन ठिकाणी दरोडे टाकणार होते. त्यांना वेळीच जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

याबाबत कॅम्प पोलिसांना खास माहिती मिळाली. यानुसार साध्या वेशातील पोलिसांनी पाळत ठेवून पापा मैदानावरून संशयित सुनील शोभराज वादवाणी (वय 30, रा. सिंधी कॉलनी), मोनू संजय सोनवणे (18, रा. जुन्या डेअरीजवळ, भायगाव शिवार), कार्तिक राजेंद्र गवळी (19, रा. श्रीकृष्णनगर, गवळीवाडा) यांना ताब्यात घेतले. यातील मोनूकडून गावठी कट्टा व एक काडतूस जप्त केले. चौकशीत त्यांनी आणखी तिघांची नावे सांगितली. पोलिसांनी पाळत ठेवून संशयित भूषण प्रकाश शेवाळे (24), हेमंत नंदलाल शेवाळे (19) व मनीष रमेश मोरे (34, सर्व रा. टेहरे) यांना अटक केली. यातील हेमंतने गणेशजवळ गावठी कट्टा ठेवण्यास दिला होता. कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. सर्व संशयित पंचशीलनगरमधील एका प्रतिष्ठिताच्या घरी दरोडा टाकण्याच्या नियोजनात होते. यानंतर आणखी तीन ठिकाणी दरोडा घालण्याचे त्यांचे नियोजन होते, असे त्यांनी तपासात सांगितल्याचे श्री. ओला यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या संशयितांपैकी भूषण, मनीष व कार्तिक हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झाले आहेत. या वेळी उपअधीक्षक अजित हगवणे, सहाय्यक निरीक्षक सुनील वसावे उपस्थित होते. कॅम्प पोलिस ठाण्यात हवालदार राजू सोनवणे, पोलिस शिपाई अनिल शेरेकर, के. टी. पवार, आनंद गावडे, देवा ठाकूर, आनंद चव्हाण आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कॅम्प पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपासात त्यांनी आतापर्यंत केलेल्या गुन्ह्यांची उकल होणार असून, गावटी कट्टे कोठून मिळाळे? याचा छडा लागणार आहे.

Web Title: Two firearms sized Six suspected bound with three living kadatusa