सिन्नरमध्ये तरसाच्या टोळीचा उच्छाद, दोघे जखमी

हरिभाऊ दिघे
सोमवार, 4 जून 2018

तळेगाव दिघे (नगर) - संगमनेर तालुक्याच्या लगत असलेल्या सिन्नर (जि. नाशिक) तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात सप्ताहापासून तरसाच्या टोळीने उच्छाद मांडला आहे. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास अण्णासाहेब भिकाजी शेंडगे (वय ५५) व राहुल अण्णासाहेब शेंडगे (वय २५) या पिता - पुत्रावर तरसाने हल्ला करीत त्यांना गंभीर जखमी केले. 

तरसाच्या टोळीने पाळीव जनावरे व माणसांवर हल्ले सुरु केल्याने सायाळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. अहमदनगर व नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील सायाळे ( ता. सिन्नर ) गाव आहे. या भागात लांडगे वगळता अन्य हिस्त्र जंगली प्राणी आल्याची घटना ऐकीवात नाही. मात्र गेल्या आठ दिवसांपासून या परिसरात ४ ते ५ तसरांच्या टोळीचा वावर सुरु आहे. 

रविवारी सायंकाळी सायाळे शिवारातील थोरात मळ्यात रामचंद्र भिका थोरात हे गवळ नदीजवळ जनावरे चारत असतांना तरसाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात थोरात यांच्या नाकाला व दोन्ही हातांना गंभीर जखमा झाल्या. पुढील उपचारासाठी त्यांना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. सायाळे व पाथरे सरहद्दीवर असलेल्या बाळू खळदकर यांच्या गोठ्यात बांधलेल्या जनावरांवर तरसाने हल्ला चढविला. त्यात खळदकर यांचे वासरु गंभीर जखमी झाले. नवनाथ थोरात यांची गाय तरसाच्या हल्ल्यात जखमी झाली. विजय विठ्ठल लांडगे यांच्या ऊसाजवळ व संजय कोरडे यांच्या डाळींब बागेनजीक गेल्या काही दिवसांपासून ४ ते ५ तरसांची टोळी फिरत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. सायाळे परिसरात उच्छाद मांडलेल्या तरसाच्या टोळीचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: two injured in Hyena attack