दोन लाख ‘गुरुजी’ नोकरीच्या प्रतीक्षेत!

रोशन भामरे
गुरुवार, 31 जानेवारी 2019

तळवाडे दिगर - गेल्या आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शिक्षक भारती प्रक्रियेस अखेर शासनाने सुरुवात केली. यामुळे लाखो विद्यार्थ्याच्या शिक्षक म्हणून नोकरी करण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. प्रथम टीईटी त्यानंतर अभियोगता चाचणी असे टप्पे ठेवूनही तरुणांनी परीश्रम घेत दोन्ही परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. केवळ दोन-तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणारी शिक्षक भारती प्रक्रिया मात्र अद्यापही लटकलेलीच आहे. त्यांमुळे डी. एड., बी.एड टीईटी, अभियोग्यता धारक विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

सरकारने ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीतून शिक्षक भरती सुरु केली आहे. प्रक्रिया संथ गतीने सुरु असून, यात अनेक अडचणी निर्माण झाल्याने डी.एड., बी.एड., टीईटी, अभियोग्यताधारक राज्यतील दोन लाख ‘गुरुजी’ मात्र नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

डी.एड., बी.एड. करून नोकरी मिळवून सेटल होणे हा फार्म्युला अगदी काही वर्षापर्यंत सुरु होता. त्यामुळे अध्यापक विद्यालयांची देखील संख्या भरमसाठ वाढली होती. २०१० मध्ये शेवटची शिक्षक भारती झाली त्यानंतर गेल्या आठ वर्षांपासून शिक्षक भारती बंद आहे. त्या काळात ८ ते १२ लाख एवढी बेरोजगारांची संख्या वाढली आहे. आर.टी.ई. अक्ट २००९ चा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यावर ३ फेब्रुवारी २०१३ च्या नंतर शासनाने शिक्षक होण्यासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करणात आली. आजपर्यंत पाच वेळा शिक्षक पात्रता परीक्षा झाली. यात ६० हजार गुरुजीच पात्र ठरले आहेत.

२३ जून २०१७ रोजी शासनाने ‘पवित्र’ संगणकीय प्रणालीद्वारे अभियोग्यता परीक्षेच्या गुणांवर शिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०१७ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातील १ लाख ९७ हजार उमेदवारांनी नोदणी केली, तर १ लाख ७७ हजार उमेदवारांनी परीक्षा दिली. २४ हजाराहून अधिक शिक्षकांची पदे राज्यात रिक्त असल्याने शैक्षणिक गुणवतेवर त्याचा परिणाम होत आहे. शिक्षण संस्थाचालकांना मुलाखतीसंदर्भात दिशानिर्देशन नसल्याने त्यांनी संकेतस्थळावर उपलब्ध जागा अपलोड केलेल्या नाहीत. रोस्टर अद्यावत करणायत आलेली नाहीत, त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा व अभियोग्यता चाचणीत गुणवत्ता सिद्ध करूनही लाखो भावी गुरुजी नियुक्तीची वात पाहत आहेत.

भरतीवर आचारसंहितेचे सावट 
आगामी काळात निवडणूक आचारसंहितेत शिक्षक भरती प्रक्रिया अडकून पडण्याची शक्यता आहे. यामुळे लखो डी.एड., बी.एड., अभियोग्यताधारक शिक्षकांमध्ये नाराजी आहे. परिणामी ४ फेब्रुवारीपासून राज्यातील हजारो उमेदवार पुण्यातील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहेत.

“ शासनाने कागदोपत्री ३ फेब्रुवारी पर्यंत जाहिराती येणार असे सांगितले असले तरी प्रशासनाच्या ज्या काही गोष्टी आहेत जसे. बिंदूनियमावली, रोस्टर ह्या झालेल्या नाहीत.तसेच सध्या महाराष्ट्रामध्ये भारती होत नसल्याने विद्यार्थ्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.आणि या असंतोषाचा उद्रेक केव्हाही होऊ शकतो.त्यामुळे ही बाब शासनाने लक्षात घेऊन आचारसंहिते पूर्वी शिक्षक भरतीची प्रक्रिया पार पाडावी.
- संतोष मगर, अध्यक्ष,डी.टी.एड., बी.एड.स्तुडट असोसिएशन

Web Title: Two lakh 'Guruji' waiting for the job!