विद्यार्थी विमा सुरक्षा योजनेतून दोन लाख रुपयांची मदत

student
student

सटाणा - येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील अनुज राजेंद्र अहिरे (इयत्ता ९ वी) या विद्यार्थ्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाल्याने मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या विद्यार्थी 'विमा सुरक्षा योजने' च्या मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत अहिरे यांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांचा धनादेश मदत स्वरुपात देण्यात आला.

अनुज अहिरे (रा. आराई, ता.बागलाण) याचे वडील (कै.) राजेंद्र अहिरे हे टेम्पोवर वाहनचालक म्हणून काम करीत असताना गेल्या वर्षी मे महिन्यात त्यांचे अपघाती निधन झाले. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने अहिरे कुटुंबियांना आधार देणे गरजेचे होते. मविप्र समाज संस्थेने गेल्या दोन वर्षांपूर्वी संस्थेतील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याने सुरक्षा योजने'च्या मेडिक्लेम पॉलिसी अंतर्गत अवघ्या १५४ रुपयांमध्ये विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढण्यात आला आहे. आज शाळेत आयोजित कार्यक्रमात संस्थेचे उपसभापती राघोनाना अहिरे व तालुका संचालक डॉ. प्रशांत देवरे यांच्या हस्ते विद्यार्थी अनुज अहिरे व (कै.) अहिरे यांच्या पत्नी श्रीमती रंजना अहिरे यांना मदत स्वरुपात दोन लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. मुख्याध्यापक बी. एस. देवरे यांनी अहिरे कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

यावेळी बोलताना उपसभापती श्री. अहिरे म्हणाले, आधुनिक शिक्षण देताना विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विमा कवच देऊन सुरक्षा मिळवून द्यावी यासाठी संस्थेच्या विद्यमान पदाधिकारी व संचालक मंडळाने विद्यार्थी विमा सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेच्या विविध शाखेतील कर्मचाऱ्यांनी या योजनेचे महत्व सर्व विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सजग राहावे, असे आवाहनही श्री. अहिरे यांनी केले. संचालक डॉ. देवरे म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतात. दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. अशा परीस्थितीत प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यास कुटुंब उघड्यावर पडते. या विमा योजनेतून विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना केवळ अपघाती मृत्युनंतरच नव्हे तर त्यांच्या उपचारांसाठी देखील मदत मिळवून देण्याचा संस्थेचा मानस आहे.  

यावेळी मुख्याध्यापक बी. एस. देवरे, उपमुख्याध्यापक ए. पी. सूर्यवंशी, आर. डी. खैरनार, एस. टी. भामरे, शेखर दळवी, विनायक बच्छाव, क्रीडाशिक्षक सी. डी. सोनवणे, यशवंत भदाणे, रामकृष्ण अहिरे, डी. बी. हयाळीज, आर. जे. थोरात, एस. पी. जाधव, डी. पी. रौंदळ, ए. ए. बिरारी, यु .टी. जाधव, एम. के. कापडणीस, एस. आर. भामरे, ए. एस. देसले, बी. टी. वाघ, आर. एस. पाटील, अरुण शेवाळे, एन. जी. जाधव, बी. ए. निकम, बी. बी. सावकार, एस. ए. सोनवणे, एच. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटील, एच. एन. कोर, एस. एस. कदम, एस. एम. पाटील, आर. डी. शिंदे, व्ही. बी. शेवाळे, जयश्री अहिरे, वैशाली कापडणीस, सागर सोनवणे, देवेंद्र भामरे, संगीता भामरे, जे. आर. वाघ, एम. आर. शिरसाठ, पी. एन. पवार, एम. जे. गावित, आशिष अहिरे आदींसह शिक्षक उपस्थित होते. आर. जे. थोरात यांनी प्रस्तास्विक व सूत्रसंचालन केले.

अशी आहे मविप्र समाज संस्थेची विद्यार्थी व कर्मचारी विमा सुरक्षा योजना:
संस्थेने न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून संस्थेतील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची मेडिक्लेम पॉलीसी काढली आहे. विद्यार्थ्यांना अवघ्या १५४ रुपयांमध्ये वर्षभरासाठी विमा संरक्षण मिळणार आहे. विद्यार्थ्याचे अपघाती निधन झाल्यास एक लाख रुपये तर कुटुंबातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास दोन लाख रुपयांची भरपाई मिळेल. तसेच गंभीर दुखापत झाल्यास उपचारांसाठी पन्नास रुपयांपर्यंत मदत मिळू शकेल. 

कर्मचाऱ्यांसाठी दोन गटात विमा संरक्षण दिले असून, पहिल्या गटात ७९९९ रुपयांमध्ये कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी एक लाख रुपयांपर्यंत तर अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपयांची भरपाई मिळेल. तर दुसऱ्या गटात ९९९९ रुपयांमध्ये वैद्यकीय उपचारांसाठी दोन लाख रुपये तर अपघाती मृत्यू झाल्यास दहा लाख रुपयांची भरपाई मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com