जळगाव विमानतळ परिसरात अखेर दोन बिबटे जेरबंद 

जळगाव विमानतळ परिसरात अखेर दोन बिबटे जेरबंद 

जळगाव - येथील विमानतळ परिसरात गेल्या महिनाभरापासून दोन बिबट्यांचा मुक्त संचार सुरू होता. या दोन्ही बिबट्यांना शुक्रवारी पहाटे जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याची माहिती जळगाव वनविभागाचे उपवन संरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. 

बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे विमान प्राधिकरणाने विमानाच्या "टेकऑफ', "लॅण्डिंग'ला अडथळे उद्‌भवण्यासह प्रवाशांच्या सुरक्षिततेस धोका पोचण्याची शक्‍यता असल्याचे वनविभागाला कळविले होते. त्यानुसार वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह सातत्याने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून शोधमोहीम राबविली. यामध्ये ट्रॅप कॅमेरा, विमानतळ प्राधिकरणाचे सीसीटीव्ही फुटेज व वनविभागाचे सीसीटीव्ही फुटेज यांचा वापर करण्यात आला. 

दोन बिबट्यांना कोणत्याही प्रकारची इजा न होता पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याबाबत परवानगी मिळविली होती. वनविभागाकडून विमानतळ परिसरात ठिकठिकाणी "कॅमेरा ट्रॅप' बसविण्यात येऊन जळगाव वनक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांनी अहोरात्र गस्त करून बिबट्यांच्या हालचाली नोंदविल्या. दोन ठिकाणी पिंजरे बसविण्यात आले. 

विमानतळाचा परिसर 750 एकर असल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी एन. जी. पाटील यांनी वनपरिक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचारी यांच्या मदतीने या दोन बिबटे ट्रॅप कॅमेरे व सीसीटीव्ही फुटेज यांचा पुरेपूर उपयोग करीत मानव वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई यांची मदत घेऊन आज पहाटे तीनच्या सुमारास पिंजऱ्यांमध्ये दोन बिबटे जेरबंद करण्यात यश मिळविले. वैद्यकीय अधिकारी संजय खाचणे यांच्याकडून बिबट्यांची पूर्णपणे तपासणी करण्यात आली. त्यांनी दोन्ही बिबटे सुदृढ असल्याचे सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com