निवृत्त अभियंता, दोन अधिकाऱ्यांसह भ्रष्टाचारप्रकरणी 30 जणांवर गुन्हे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

चिपळूण - बोरगाव नळपाणी योजनेच्या गैरव्यवहारप्रकरणी 30 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागाचे दोन अधिकारी, निवृत्त कार्यकारी अभियंता, ठेकेदार आणि बोरगाव ग्रामपंचायतीच्या तीन समित्यांमधील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी नूतन विलास सावंत यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. विकासकामांतील गैरव्यवहारावरून 30 जणांवर फौजदारी दाखल होण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.

योजनेविषयी विद्याधर साळुंखे यांनी पंचायत समितीसह जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुहागरचे उपअभियंता व जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी योजनेची चौकशी केली. चौकशीत पाणी योजनेच्या अंदाजपत्रकाप्रमाणे कामे झालेली नाहीत. योजनेच्या विविध कामांत अनियमितता आहे. एकूण 20 लाख 45 हजार 178 रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे, असा अहवाल दोन्ही अधिकाऱ्यांनी दिला होता. याप्रकरणी उपअभियंता, शाखा अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता, ठेकेदार, पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, महिला विकास समिती व लेखापरीक्षण समिती सदस्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली.

Web Title: Two servants of corruption cases,