बीएस्सी पेपरफुटी प्रकरणातील दोघा विद्यार्थ्यांना पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संकेतस्थळ हॅक करून एसवायबीएस्सीच्या लिनिअर अलजेब्रा या विषयाच्या पेपरफुटी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोघा विद्यार्थ्यांना येत्या 10 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात आयटी अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे आदेश गजेंद्र चोपडे (वय 21, रा , ऋषिप्रसाद बंगला, खुटवडनगर, सीटू भवनजवळ, नाशिक), चिन्मय दीपक अटराव्हलकर (वय 22, रा. शाहूनगर, जळगाव, हल्ली रा. नाशिक), अशी दोघा संशयितांची नावे आहेत. गेल्या 28 एप्रिलला एसवायबीएस्सीचा लिनिअर अलजेब्रा या विषयाचा पेपर आदल्या दिवशीच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिस तपासात या दोघा संशयितांनी केलेले कृत्य समोर आले. याप्रकरणी विद्यापीठाचेच संकेतस्थळ हॅक करून पेपर फोडणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. 7) न्यायालयात हजर केले असता, त्यांना 10 तारखेपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा तपास पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक देवराज बोरसे करीत आहेत. 

Web Title: Two students in B.Sc. police custody