PHOTO : टॅंकरमधून संशयास्पदरीत्या द्रवपदार्थ काढला जात होता...पाहिल्यावर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 29 डिसेंबर 2019

हरियाणाकडून कर्नाटककडे जाणाऱ्या दोन टॅंकरमधून पॉइंट हायमास्ट स्ट्रीटलाइटखाली परराज्यातून आलेल्या दोन टॅंकरमधून संशयास्पदरीत्या काही द्रवपदार्थ काढला जात होता. आयशर व पिक-अपमधील बॅरेलमध्ये तो भरला जात होता. त्यावेळीच असे काही घडले..

नाशिक : मुंबई- आग्रा महामार्गावर धुळे-शिरपूरदरम्यान मद्य बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्पिरिटने भरलेले दोन टॅंकर शनिवारी (ता. 28) पहाटे सापळा रचून जप्त करण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक पथकाने चौघा संशयितांना ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 70 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही टॅंकर हे हरियानाकडून कर्नाटकमध्ये चालले होते. 

अशी घडली घटना...
मुंबई- आग्रा महामार्गावरील धुळे-शिरपूरदरम्यान सांगवी शिवारात राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने सरत्या वर्षाच्या दोन दिवस आधीच मोठी कारवाई केली. तीन महिन्यांपूर्वीच नाशिक येथे बदली होऊन आलेले व पथकाचे निरीक्षक हृषीकेश फुलझळके यांना परराज्यातून येणाऱ्या वाहनातून मोठ्या प्रमाणात अतिशुद्ध असे मद्यार्क असलेल्या स्पिरिटची अवैधरीत्या वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (ता. 27) रात्रीपासूनच महामार्गावरील सांगवी शिवारात सापळा रचला होता. त्या वेळी शनिवारी (ता. 27) पहाटे तीनच्या सुमारास हरियानाकहून कर्नाटककडे जाणाऱ्या दोन टॅंकरमधून पॉइंट हायमास्ट स्ट्रीटलाइटखाली परराज्यातून आलेल्या दोन टॅंकरमधून संशयास्पदरीत्या काही द्रवपदार्थ काढला जात होता. आयशर व पिक-अपमधील बॅरेलमध्ये तो भरला जात असताना, उत्पादन शुल्कच्या पथकाने छापा टाकून दोन्ही टॅंकरचालकांना ताब्यात घेतले. एचआर 61- ए 9889 या टॅंकरमध्ये 21 हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क, एचआर 55- एन 0691 या टॅंकरमध्ये 25 हजार लिटर अतिशुद्ध मद्यार्क, आयशर टॅम्पो एमएच 18- एए 502 मध्ये 4400 लिटर अतिशुद्ध मद्यार्क, तर पिक-अप एमएच 18- एए 6642 मध्ये 1600 लिटर अतिशुद्ध मद्यार्क, असा 70 लाख दोन हजार 500 रुपयांचा माल जप्त केला. 

हेही वाचा > चलती है क्या ?'तिला रिक्षात बसण्याचा इशारा केला..अन् त्यावेळीच..

Image may contain: one or more people and outdoor

उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाची कारवाई, मुद्देमाल जप्त 
या पथकाने संशयित धर्मबीर जिलेसिंह (रा. संबोधित जिलेसिंह उमेर्वास, 10, भिवानी, हरियाना), मंजुनाथ रामअण्णा सिरंजी (रा. रामअण्णा रोट्टिगवाड, कोंकणकुरट्टी, धारवाड, कर्नाटक), ओमप्रकाश रामफल जाट्ट (रा. डिघल, हरियाना), परवीन धर्मवीर लसकरी (रा. लकडिया, ता. बेरी, हरियाना) या चौघांना अटक करण्यात आली. आयशर व पिक-अपचे चालक वाहन सोडून पसार झाले. ही कामगिरी विभागाचे उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक फुलझळके, डी. के. मेंगाळ, ए. यू. सूर्यवंशी, देवदत्त पोटे, एस. एस. रावते, बी. आर. नवले, एम. पी. पवार, एन. एस. गायकवाड, एस. पी. कुटे, एस. एस. गोवेकर, गोकुळ शिंदे, दीपक आव्हाड, लोकेश गायकवाड, विठ्ठल हाके, अमन तडवी, ए. व्ही. भडांगे, एस. एच. देवरे, के. एम. गोसावी, गोरख पाटील, केतन जाधव, प्रशांत बोरसे व रवींद्र देसले यांच्या पथकाने बजावली. 

हेही वाचा > ...यामुळे तीन दिवसांच्या तान्हया बाळाला सोडून आई..."माता न तू वैरिणी"

Image may contain: people standing and outdoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two tankers carrying Spirit transport seized near Shirpur Nashik Crime Marathi News