धुळ्यात दुचाकीस्वाराची दादागिरी; बसमधून चालकाला खेचले खाली

क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वाराने धिंगाणा घातला.
Bus Driver
Bus Driveresakal

धुळे : शहरातील ऐंशी फुटी रोडवरील नटराज चित्रमंदिर परिसरात क्षुल्लक कारणावरून दुचाकीस्वाराने धिंगाणा घातला. त्याने एसटीमधून चालकाला खाली खेचत मारहाण केली. शिवाय बसच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकारामुळे प्रवासी भयभीत झाले.

घटनेनंतर चोपडा डेपोचे चालक सचिन पाटील यांनी एसटी थेट शहर पोलिस ठाण्यात आणत तक्रार दिली. चालक पाटील व वाहक राकेश पाटील शुक्रवारी चोपडा- नाशिक बस नेत होते. धुळ्यातील नटराज चित्र मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. तेव्हा चालक पाटील याने पुढील दुचाकीस्वाराला तुझी गाडी पुढे घे, असे सांगितले. त्याचा राग येऊन त्याने थेट चालकाला बसमधून खाली खेचत बेदम मारहाण केली. तसेच बसच्या पुढील काचेला दगड मारून नुकसान केले. या प्रकारामुळे गर्दी झाली आणि वाहतूक ठप्प पडली. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर दुचाकीस्वार पळून गेला. दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला.

Bus Driver
...अन्‌ तलाठ्याने तहसीलदारांवर उधळल्या नोटा; सर्वत्र चर्चांना उधाण
Bus Driver
शेतजमीन कामकाजासाठी लाचेची मागणी; तहसीलदारासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com