राज्यातील प्रत्येक शाळा दोन वर्षांत 'वाय-फाय' - नंदकुमार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

घाणेगाव (ता. साक्री) - राज्यातील जिल्हा परिषदांच्या 19 हजार हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. जुने दूरचित्रवाणी संच शाळेला भेट द्या, त्यामुळे प्रत्येक वर्गच डिजिटल होईल, ही आगामी संकल्पना आहे. येत्या दोन वर्षांत प्रत्येक शाळा "वाय-फाय' होणार आहे. "वाय-फाय'मुळे केपटाऊनच काय प्रत्येक देशातील शाळेशी संपर्क होऊ शकेल. त्यामुळे शैक्षणिक विकासाचे नवे दालनच खुले होईल, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांनी केले.

घाणेगाव (ता. साक्री) येथे राज्यातील जिल्हा परिषदेच्या पहिल्या "वाय- फाय' शाळेचे उद्‌घाटन श्री. नंदकुमार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नूतन पाटील, शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, शिक्षणाधिकारी मोहन देसले, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे, साक्रीचे गटशिक्षणाधिकारी बी. बी. भिल, "डाएट'च्या प्राचार्या विद्या पाटील, नंदुरबारचे निरंतरचे शिक्षणाधिकारी जे. एस. पाटील, माजी आमदार जे. यू. ठाकरे, मंजू गुप्ता फाउंडेशनचे रावसाहेब बढे, केंद्रप्रमुख सुनंदा पाटील, शिक्षण विस्ताराधिकारी बी. ए. भामरे आदी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले, की डिजिटलायझेशन प्रक्रियेत इंग्रजी भाषेचा अडसर होऊ शकतो. मात्र, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हिंदीतूनही समजणार आहे. पष्टेपाड्याची (ठाणे) शाळा ही सर्वाधिक गुणवत्तापूर्ण शाळा आहे. महाराष्ट्र गणितात शेवटून पाचव्या क्रमांकावर म्हणजे सर्वाधिक मागे आहे. तर्क लावून शिक्षण घेतले पाहिजे. पूर्ण जग आपले व्हायला हवे.

श्री. देशमुख म्हणाले, की ग्रामस्थांच्या सहभागातून शिक्षणात बदल होत आहेत. "पेसा' निधीतून 25 टक्के शाळेसाठी खर्च करा. "वाय-फाय' हे साधन आहे. पण विद्यार्थ्याची गुणवत्तावाढ हे साध्य आहे, हे शिक्षकांनी विसरू नये. जागतिक स्पर्धेला तोंड देणारे विद्यार्थी घडविले पाहिजेत. जिल्हा वार्षिक नियोजनातून शाळेसाठी निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्याध्यापक किशोर पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हर्शल विभांडिक यांनी प्रास्ताविक केले. युवराज बागूल यांनी आभार मानले.

Web Title: two years, the state schools 'Wi-Fi'